राजकीय

‘हे आमदार, खासदार सो कॉल्ड जी माकडं आहेत, खासदार उदयनराजे संतापले

 

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आपल्या कडक स्वभावामुळे ओळखले जातात. यापूर्वी सुद्धा त्यांची अनेक भाषणे आणि विरोधीयांवर केलेली टीका सतत चर्चेत विषय ठरताना दिसून आला आहे. त्यातच आता एका बैठकीत सातारा क्रिडा संकुलच्या बाबतीत संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. सातारच्या क्रिडा संकुलाचं वाटोळं करणाऱ्याचं मुस्काड फोडलं पाहीजे, असं ते म्हणाले आहेत. याशिवाय इतरही अनेक मुद्द्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

यावरी त्यांनी विरोधकांवर चूकीच्या पद्धतीने संकुल उभारलं असल्याचा आरोपही केला आहे. ते म्हणाले.’त्याकाळी रणजी ट्रॉफी शाहू स्टेडीयमवर भरवल्या जात होत्या. रणजीही झाल्या. सातारा प्राईम एरीया आहे. स्टॅंडच्या शेजारी आहे. एवढं असतानाही संकुल उभारलं गेलं नाही, असा संताप त्यांनी व्यक्त करत काही शंका उपस्थित केल्या आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, ‘बी.जी. शिर्केंनी बालेवाडीचं स्टेडीयम कॉमन वेल्थसाठी उभारणी केली होती. आज त्यांंनी आपल्या संकुलासाठी निघालेल्या टेंडरचा फॉर्म भरला होता’, असं सांगून ते पुढे म्हणाले,’हे यासाठी सांगतोय हे मीडियात आलं पाहिजे. ही आमदार, खासदार ही जी सो कॉल्ड माकडं आहेत. त्यांनी यातून बोध घ्यायला पाहिजे.’असं खडसावलं आहे.

Back to top button