
कै.व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव
” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी “
बाभळगाव : दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, शिक्षण विभाग माध्यमिक महाराष्ट्र आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शासनाच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. महावीर कटके यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अंगद कोते, स्टाफ सचिव डॉ. जयदेवी पवार, प्रा. विवेक कदम, प्रा. हरिहर गायके, दत्ता फुलगामे, माजी विद्यार्थी इरफान शेख, अमित कटारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी डॉ. अभिजीत बादाडे, बाळासाहेब देशमुख, डॉ.शाहूराज मुळे, प्रा. बालिका गौंड, प्रा. नंदा खरटमल, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.दशरथ भिसे, डॉ. मा.ना. गायकवाड, डॉ.रणजीत जाधव, प्रा. संदीप पान चेवले, अंकुश थडकर, प्रा. चंद्रकांत मोरे, प्रा. ज्ञानदेव कांबळे, प्रा. संतोष कल्याणकर, प्रा.सोपान डोपे आणि वसंत मस्के यांची उपस्थिती होती.



