📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

विनायक प्राथमिक शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

विनायक प्राथमिक शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
दि. १४ एप्रिल ( बीड प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे प्रणेते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते, अशोक काशीद सर, शैलजा बावसकर मॅडम,तन्वीर पठाण सर, उत्तरेशोर भारती सर,अनिल लेहने सर, गणेश भागडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा माहिती शाळेचे शिक्षक बाळू काळे सरांनी दिली.शाळेतील शिक्षिका प्रतिभा वाघमारे मॅडम, रिता वाघमारे मॅडम यांनी ज्ञानाचा अथांग सागर भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांतून डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक प्रसंगांचे वर्णन करून दिनदलितांचे कैवारी, न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करून अजरामर झाले अशा महामानवांच्या विचारांची आजही गरज आहे असे महत्वपूर्ण विचार व्यक्त करून अभिवादन व्यक्त केले. या जयंतीनिमित्त शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
Back to top button