बीड

पोलिस उपनिरीक्षक राजा भाऊ गुळभिले यांच्या संवेदनशील उपक्रमामुळे हरवलेल्या आजींची सहा वर्षांनी कुटुंबाशी पुनर्भेट 

पोलिस उपनिरीक्षक राजा भाऊ गुळभिले यांच्या संवेदनशील उपक्रमामुळे हरवलेल्या आजींची सहा वर्षांनी कुटुंबाशी पुनर्भेट
बीड ( प्रतिनिधी ) : वडवणी तालुक्यातील तीगाव वस्ती येथील रहिवाशी 90 वर्षाची गयाबाई जाधव ही वयोवृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत शहरातील बस स्टॅन्ड एरियात एका सामाजिक कार्यकर्त्याला आढळल्याने त्याने तशाच अवस्थेत बीड येथील बेघर जिव्हाळा निवारा केंद्रामध्ये दाखल केले. बेघर जिव्हाळा केंद्राच्या  टीमने तिला कोरोनाच्या काळात उपचारासाठी शासकीय दवाखान्यात ऍडमिट केले. सात आठ दिवसांनी तिची प्रकृती उत्तम झाल्यानंतर बेघर निवारा केंद्राचे संचालक अभिजीत वैद्य, व्यवस्थापक राजू वंजारे, व काळजीवाहक छायाताई सरोदे यांनी बेघर जिव्हाळा केंद्रात तिला दाखल करून घेण्यात आले. निवारा केंद्रामध्ये गेली सहा वर्षापासून आजीला वेळोवेळी औषधोपचार देऊन उत्तमरीत्या देखभाल करून सांभाळले. माणुसकीची भावना आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर याचा उत्कृष्ट नमुना तिगाव येथे पाहायला मिळाला. मागील सहा वर्षांपासून कुटुंबापासून दुरावलेल्या गयाबाई बाबुराव जाधव यांच्या बाबतची माहिती पोलिस उपनिरीक्षक राजा भाऊ गुळभिले यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये शेअर केली होती. या छोट्या प्रयत्नातून मोठी मदत झाली आणि हरवलेल्या आजींचा शोध लागला गया बाई जाधव यांना त्यांच्या मूळ गावी त्यांच्या सून भागाबाई बन्सी जाधव यांच्यामार्फत पाठवताना एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, पोलीस उपनिरीक्षक राजू गुळभिले, विजय जाधवर,दै. किसानचे कार्यकारी संपादक अदनान खान, तसेच पोलीस कर्मचारी सिद्धांत गोरे, राहुल गायकवाड, दत्ता कदम, सिद्धार्थ  खुडूक, व सोमनाथ कुचेकर आदींची उपस्थिती होती. बेघर निवारा केंद्राच्या वतीने आजींचा सन्मान करून त्यांना साडी व शाल देत निरोप देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आजींच्या सुरक्षित पुनर्वसनाचा आनंद व्यक्त करत, समाजातील संवेदनशीलतेचे हे उदाहरण सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.कार्यक्रमादरम्यान बोलताना पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले की,एका छोट्या संदेशानेही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते. समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमात हातभार लावावा.गया बाईंच्या कुटुंबीयांनीही पोलिस, सामाजिक कार्यकर्ते व निवारा केंद्राचे आभार मानत त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे कार्यक्रमाची प्रस्तावना अभिजीत वैद्य सूत्रसंचालन राजू वंजारे, व आभार काळजीवाहक छायाताई सरोदे यांनी मानले. कार्यक्रमास बेघर निवारा केंद्रातील लाभार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Back to top button