बीड
सेतू केंद्र चालकांवर अन्याय; मानधनाशिवाय निवडणूक कामाचा बोजा

बीड (प्रतिनिधी ) – दि. 11 जुलै : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR-2026) मोहिमेसाठी बीड विधानसभा मतदारसंघातील अनेक सेतू सुविधा केंद्र चालकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे सहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, या कामासाठी कोणतेही मानधन, प्रवास भत्ता (TA), दैनिक भत्ता (DA) किंवा इतर आर्थिक तरतूद नसल्याने सेतू केंद्र चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार सेतू केंद्र चालकांना मतदार पडताळणी, Enumeration Form भरणे, विशेष शिबिरांमध्ये उपस्थिती, कागदपत्रांची पडताळणी आणि इतर निवडणूक कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु या अतिरिक्त जबाबदाऱ्यांसाठी कोणतेही मानधन जाहीर करण्यात आलेले नाही.
सेतू केंद्र चालक हे स्व-रोजगारावर आधारित सेवा देतात. निवडणुकीच्या कामासाठी दिवसभर वेळ द्यावा लागल्यास त्यांचे नियमित काम बंद राहते, त्यामुळे त्यांना थेट आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत कोणतीही आर्थिक भरपाई न देता काम करण्यास भाग पाडणे हा अन्याय असल्याची भावना चालकांनी व्यक्त केली आहे.
सेतू केंद्र चालकांची मागणी आहे की, निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करण्यास त्यांची हरकत नाही; मात्र शासनाने त्यांच्या श्रमाचा योग्य सन्मान करत मानधन, प्रवास भत्ता आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या आणि सेवा अटी स्पष्टपणे जाहीर कराव्यात.
याबाबत सेतू केंद्र चालकांकडून जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोग यांच्याकडे निवेदन सादर करण्याची तयारी सुरू असून, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
“सेवा घेताना सन्मानही द्या; मानधनाशिवाय कामाची सक्ती थांबवा,” अशी भूमिका बीड जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र चालकांनी मांडली आहे.