पुण्यात भाजपने नवाब मलिकांचा पुतळा जाळला

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते यांच्यातील वाद आता विकोपाला पोहचताना दिसून येत आहे. त्याच आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप लगावले होते. या आरोपणानंतर राज्यातील वातावरण आता तापले असून भाजपने थेट नवाब मालिकांविरोधात मोर्चा उघडला आहे.
त्यातच पुण्यात सुद्धा मलिक यांनी लगावलेल्या आरोपानंतर पडसाद उमटताना दिसून आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देवेंद्रजी अंगार है अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. पुण्यातल्या कर्वे रस्त्यावर मंत्री नवाब मलिक यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, १९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. ते घडवणाऱ्या आरोपींची प्रॉपर्टी विकत घेण्याचे काम नवाब मालिक यांनी केले आहे. ज्या लोकांनी देशद्रोह केला. या घटनेत शेकडो निरपराध व्यक्तींची हत्या झाली. अशा लोंकाची प्रॉपर्टी विकत घेऊन देशाशी गद्दारी करत नवाब मलिकने देशद्रोह केला आहे. नवाब यांना सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. ज्या शिवसेनेने हिंदुत्वाचा नारा दिला. देशद्रोहाला मदत करणाऱ्या अशा मंत्रीबाबत शिवसेनेने दखल घेऊन कारवाई केली पाहिजे.