संपादकीय

एसटी कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत, भाजपा नेते प्रवीण दरेकरांनी साधला निशाणा

 

मुंबई | एसटी महामंडळाचा राज्य सरकारमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. अशातच ठिकठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित आघाडी आणि भारतीय जनता पक्षाने पाठींबा दिला आहे. याचपार्श्वभूमीवर मंत्रालयावर आज एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा धडकला आहे.

मात्र यापूर्वीच राज्यभरातून आलेल्या काही एसटी कर्मचाऱ्यांना मानखुर्द जकात नाक्यावर पोलिसांकडून अडवण्यात आले. यावेळी मानखुर्दजवळ एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यावेळी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर य़ांनी देखील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी प्रविण दरेकर यांनी “३९ कर्मचारी आपल्या प्राणाला मुकले. अजून किती कर्मचाऱ्यांचे बळी सरकारला हवे आहेत? असा सवाल उपस्थित केला.

दरेकर म्हणाले की, एसटी कर्मचारी जीवाला वैतागले आहेत. जिवंत असून मेल्यासारखं कसे जगायचे? या मानसिकतेतील कर्मचाऱ्यांच्या संवेदना जर सरकारला कळत नसतील तर एवढं असंवेदनशील सरकार मी कधी पाहिले नाही. एसटी कर्मचाऱ्यांसोबत सरकारने जुलमी दडपशाही करु नये अशी विनंती आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका अस दरेकर म्हणाले आहेत.

Back to top button