बीड

छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नवीनशैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमात समाविष्ट करा या मागणीसाठी प्रा. सत्येंद्र पाटील यांनी उभारलेल्या चळवळीस मुख्याध्यापकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास नवीनशैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमात समाविष्ट करा या मागणीसाठी प्रा. सत्येंद्र पाटील यांनी उभारलेल्या चळवळीस मुख्याध्यापकांचा उत्स्फूर्त पाठिंबा
बीड दि.१६ (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शिक्षण धोरण -2020  या शैक्षणिक अभ्यासक्रमात
छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करा या मागणीसाठी शिक्षक नेते प्रा. सत्येंद्र पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंती दिनापासून एक व्यापक चळवळ सुरू केली. या चळवळीला बीड जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी एकमुखी पाठिंबा दिला. शिवाय जोपर्यंत आपली मागणी मान्य होऊन नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाविष्ट होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाहीत असा निर्धार मुख्याध्यापकांनी व्यक्त केला.
   महाराष्ट्रात सुराज्य निर्माण करावयाचे असेल नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास माहीत असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन आमची नवी पिढी चारित्र्य संपन्न, बलवान आणि सामर्थ्यशाली बनली पाहिजे. त्यामुळे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार आखलेल्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा समावेश करणे आवश्यक आहे. त्या मधून येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र आणि कार्याची माहिती मिळेल. त्यातून धैर्यवान कृतिशील आणि चारित्र्यसंपन्न अशी पिढी निर्माण होणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून बीड शहर सार्वजनिक शिवजन्मोत्सव
समितीचे अध्यक्ष प्रा. सत्येंद्र पाटील सरांनी शिवजन्मोत्सवाच्या पवित्र व्यासपीठावरून हा विचार मांडला. प्रा. पाटील सरांच्या या विचाराला आज  चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. प्रा. पाटील सरांनी उभ्या केलेल्या या चळवळीस बीड जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी मंगळवार दिनांक 18 रोजी बीड शहरातील सौ के एस के महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत
पाठिंबा देऊन छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची एकमुखी मागणी केली. शिवाय मागणी मान्य होईपर्यंत आणि स्वस्थ बसणार नाही असा निर्धार उपस्थित मुख्याध्यापकांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी बीड जिल्ह्यातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 दरम्यान या चळवळीची महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना. श्री. दादाजी भुसे यांनी दखल घेऊन चर्चा करण्यासाठी पुढच्या आठवड्यात शिष्टमंडळाला बोलावले आहे.
Back to top button