बीड
जिल्हाधिकारी साहेब बीड़ नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी लावा नसता लोकसेना संघटना आंदोलन करणार ॲड. इलियास इनामदार

जिल्हाधिकारी साहेब बीड़ नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी लावा नसता लोकसेना संघटना आंदोलन करणार ॲड. इलियास इनामदार
बीड प्रतिनिधि: लोकसेना संघटनेने बीड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की बीड़ नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी तात्काळ लावावी नसता लोकसेना संघटना आंदोलन करणार बांधकाम विभागातील न. पा. फंडचे कोट्यावधीचे भ्रष्टाचार करून बोगस बीले उचलून मुख्याधिकारी बांधकाम अभियंता सहाय्यक अभियंता कर्मचारी यांनी कोटयावधीची विल्हेवाट लावली आहे असे अनेक वृत्तपत्रात भ्रष्टाचाराविषयी आलेल्या दररोजच्या बातम्या, सामाजिक कार्यकर्ते व RTI कार्यकर्ते यांच्या आंदोलनाच्या मागण्या आपण याठिकाणी पाहु शकता. एकीकडे नगरपालिका आम जनतेकडून सक्तीने कर वसूल करत आहे तर दुसरीकडे या कर वसूलीचा पैसा शहर विकासासाठी व बीड शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्याऐवजी बांधकाम अभियंता व त्यांच्या बगलबच्च्यांनी काही निवडक कर्मचा-याच्या संगतीने बनावट इस्टीमेट तयार करून, बोगस बिले काढून निधीचा अपहार केला आहे. तसेच नगर पालिकेच्या अनेक विभागात भ्रष्टाचार होताना आपल्याला दिसत आहे मग ते पाणि पुरवठा असेल किंवा इतर दुसरे विभाग असेल बीड जिल्हाधिकारी साहेबांनी जानेवारी 2023 ते 2025 च्या आज तारखेपर्यंतचे ऑडिट करण्याचे निर्देश देवून झालेल्या भ्रष्टाचाराची पोल खोल करावी नसता लोकसेना संघटना जन आंदोलन करणार आहे असा इशारा जिल्हा प्रशासनाला लोक सेना संघटना प्रमुख ॲड. इलियास इनामदार यांनी दिलेला आहे.



