बीड
नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून जि.प. पाचेगांव शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे प्रस्तावित..

नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून जि.प. पाचेगांव शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे प्रस्तावित..
तर
सिनेअभिनेत्री श्रेया पिळगांवकर यांच्या हस्ते तब्बल ९५१ विद्यार्थाना शालेय साहित्य वाटप होणार…
कोळगाव बाळासाहेब घाडगे – गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी १०. वा.जि.प. शाळा येथे ९५१ विद्यार्थ्याना नभांगण फाऊडेशन च्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री श्रेया सचिन पिळगांवकर याच्या हस्ते व नभांगण फाऊंडेशन च्या अध्यक्षा तथा सत्यशोधक चित्रपटातील सावित्रीबाई यांच्या भूमिकेसाठी २०२५ च्या फिल्म फिअर अवार्ड विजेत्यां सिने अभिनेत्री राजश्रीताई देशपांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शालेय शिक्षण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील भाग विकसित होण्यासाठी आपला हातभार म्हणून नभांगन फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सिने अभिनेत्री राजश्रीताई देशपांडे यांनी फाउंडेशन द्वारे व श्री सुमत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच वर्षापासून पाचेगाव परिसरात नदी खोलीकरण रुंदीकरणाचे काम घेऊन शेकडो शेतकऱ्यांना जलसमृध्दी केले आहे. त्याचबरोबर गावातील शाळेच्या वर्ग खोल्यांचे जे खूप जुने बांधकाम आहे त्याची अवस्था पाहून त्यांनी ही शाळा नवीन वर्ग खोल्या बांधून आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी इच्छा व्यक्त केली. त्याअनुषंगाने शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आले. यामध्ये राजश्री देशपांडे यांनी जिल्हा परिषदच्या तीन शाळेचे अद्यावत बांधकाम करून दिले आहे. नभांगन फाउंडेशनव्दारे श्री कानिफनाथ नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेल्या महिन्यात आल्या असता जिल्हा परिषद पाचेगाव शाळेला त्यांनी भेट दिली. अंदाजे १९६५ ला इमारतीचे बांधकाम झाल्यामुळे इमारत मोडकळीस आली आहे .शाळाची ही अवस्था पाहून त्यांनी शाळाला नवीन खोल्या बांधकाम करून देण्याचा मानस व्यक्त केला. प्रशासकीय पुर्ततेसाठी सर्व कागदपत्रासह प्रस्ताव जिल्हा परिषद बीडला मान्यतेसाठी पाठवला आहे. तरी शाळेच्या नवीन बांधकामाच्या पुढील नियोजनासाठी व शालेय साहित्य वाटपासाठी त्या उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती सुमंत पांडेसाहेब यशदा डायरेक्टर पुणे व अतुल कुलकर्णी महाराष्ट्र टाईम्स जिल्हा प्रतिनिधी बीड कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे लाभणार आहेत. सावरगेकर इंजिनिअर तसेच शिक्षणविस्तार अधिकारी काळम पाटील, प्रियंका घोडके मंडळ अधिकारी पाचेगाव हे उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी परिसरातील शिक्षक, शिक्षणप्रेमी विद्यार्थी, पालक, हितचिंतक, परिसरातील व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषद शाळा पाचेगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.



