📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

न्यू इंग्लिश स्कूल राजुरीत ‘एक राखी सैनिकांसाठी’विद्यार्थिनींचा उपक्रम

न्यू इंग्लिश स्कूल राजुरीत ‘एक राखी सैनिकांसाठी’विद्यार्थिनींचा
उपक्रम

जामखेड प्रतिनिधी – रक्षाबंधन सणानिमित्त दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी येथे ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सीमेवर तैनात असलेले जवान आपल्या बहिणींना भेटू शकत नाहीत, ही जाणीव ठेवून विद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रेम, सन्मान आणि कृतज्ञतेचा संदेश देत सैनिकांसाठी खास राख्या पोस्टाने पाठवल्या.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, राजेंद्र पवार, श्रीमती सुनिता पिसाळ, सुभाष बोराटे, सय्यद जुबेर, विजय क्षीरसागर, अक्षय मोहिते, शशिकांत सदाफुले, अनिकेत चौभारे, उमराव लटपटे, हनुमान राऊत यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पोस्ट विभागातील योगिनी देवडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Back to top button