बीड

पंढरपूर येथे राधाकृष्ण आश्रमाच्या भव्य सभा मंडपाचे उद्घाटन व भूमिपूजन

पंढरपूर येथे राधाकृष्ण आश्रमाच्या भव्य सभा मंडपाचे उद्घाटन व भूमिपूजन
बीड-प्रतिनिधी:हिंदू धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे राधाकृष्ण आश्रमाचे संस्थापक सहदेव महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या भव्य सभा मंडपाच्या उद्घाटन व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अखिल भारतीय देवसेना गुजर समाजाचे जिल्हाध्यक्ष रतन गुजर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील गुजर, जिल्हा सचिव गजानन बहिरवाळ, नारायण बहिरवाळ, तसेच सरपंच राम बहिरवाळ आणि माजी उपसरपंच अर्जुन येवले यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “सहदेव महाराज शास्त्री यांनी स्वखर्चातून जागा उपलब्ध करून दिली असून आज या भव्य वास्तूच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येत आहे. या पवित्र कार्यासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा असून आम्ही सर्वजण तन-मन-धनाने महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सर्व समाजबांधवांनी देखील या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे.”
या कार्यक्रमास संत, महंत, महिला मंडळ तसेच विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी महाराजांना शुभेच्छा देत या कार्यासाठी आपापला खारीचा वाटा उचलून बांधकाम पूर्णत्वास नेण्याचे आवाहन शिंदे महाराज यांनी केले.
याप्रसंगी सहदेव महाराज शास्त्री म्हणाले की, “ही वास्तू उभारण्यासाठी आपण सर्वांनी मला सहकार्य करावे. हे स्थळ आपणा सर्वांचे हक्काचे ठिकाण व्हावे व त्यात प्रत्येकाचे मोलाचे योगदान असावे, हीच अपेक्षा मी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो.”
Back to top button