अनिल पानसंबळ यांची राष्ट्रवादी (शप) शिक्षक आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधी :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा शिक्षक आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस पदी अनिल पानसंबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघर्षयोद्धा जनसंपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते अनिल पानसंबळ यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी संतोष भोसले, प्रवीण परजणे, भाऊसाहेब कदम, गिरीश चाळक, अजय चव्हाण, नितीन येळवे, नारायण गवते, विलास परजणे, उत्कर्ष भसमारे, चाळक सर,विष्णू उबाळे,गणेश मदने, बद्रीनाथ जटाळ, सतीश कळसुले आदी मान्यवर उपस्थित होते.
बीड येथील शिवाजी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनिल पानसंबळ हे शैक्षणिक चळवळीबरोबरच सामाजिक व विधायक कार्यात सातत्याने सहभागी असतात. शिक्षक या नात्याने समाजात सामाजिक भान जागृत ठेवत लोकसेवा करण्याची त्यांना प्रामाणिक आवड आणि दृढ इच्छाशक्ती आहे.
पानसंबळ यांच्या कार्यातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना व नागरिकांना मदतीचा हात मिळाला असून त्यांच्या लोकसंपर्क, संघटन कौशल्य आणि अनुभवाचा लाभ पक्षाच्या संघटन विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात होईल,
“अनिल पानसंबळ यांच्यासारख्या समर्पित शिक्षकामुळे समाज उन्नतीचा मार्ग सुलभ होतो. पक्षाचे विचार, ध्येय आणि धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी ठरेल.”
असा विश्वास जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी यावेळी व्यक्त केला.



