महाराष्ट्र

पांढरकवडा येथे अखिल भारतीय माळी महासंघाचा भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी 

पांढरकवडा : अखिल भारतीय माळी महासंघ, यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल भवन, पांढरकवडा येथे दि. १७ जानेवारी २०२६ (शनिवार) रोजी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा उत्साहात व हर्षोल्लासात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळापूर (अकोला) मतदारसंघाचे माजी आमदार मा. श्री. बळीरामभाऊ शिरस्कर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. संध्याताई गुरनुले (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, चंद्रपूर) यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. प्रविणभाऊ पेटकर (प्रदेश उपाध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ), श्री. सुभाष सातव (राष्ट्रीय सरचिटणीस), मा. वर्षाताई लोणबले (पंचायत समिती सदस्य, मूल), श्री. दिपक वाढई (माजी समता परिषद अध्यक्ष, चंद्रपूर) व श्री. रामभाऊ भेंडारे (जिल्हाध्यक्ष, यवतमाळ) उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणून श्री. कृष्णाभाऊ महादुरे (उद्योजक, नागपूर), श्री. गजानन निकुरे (सामाजिक कार्यकर्ते, वरोरा), डॉ. श्री. विनोद निकुरे (वरोरा), श्री. राजेश निकोडे (माजी पंचायत समिती सदस्य, घाटंजी), श्री. तुलसीदास मोहुर्ले, श्री. विठ्ठल गुरनुले सर, श्री. दत्ताजी सोनुले (मानोली), सौ. जयाताई महादुरे, सौ. रेखाताई मोहुर्ले (तालुकाध्यक्ष, पांढरकवडा) व सौ. मंदाताई वाढई आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटक म्हणून बोलताना मा. संध्याताई गुरनुले यांनी पाच वेळा जिल्हा परिषद सदस्य व दोन वेळा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मिळालेल्या अनुभवाचा आढावा घेत निवडणुका यशस्वीपणे कशा लढवाव्यात, याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

मा. श्री. प्रविणभाऊ पेटकर यांनी समाजातील एकजूट अत्यावश्यक असल्याचे सांगत उपस्थित कार्यकर्त्यांच्या मनाला हात घातला. श्री. दिपक वाढई यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून समाजासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. तर श्री. रामभाऊ भेंडारे यांनी समाजाने निवडणुकांच्या रणांगणात उतरून आपली ताकद दाखवावी व प्रस्थापितांवर राजकीय दबाव निर्माण करावा, असे मत व्यक्त केले.

श्री. राजेंद्रभाऊ मांदाडे (विदर्भ संघटक) यांनी समाजातून नवे युवा नेतृत्व उभे करण्याची गरज व्यक्त करत गोरगरीब घटकांच्या पाठीशी सातत्याने उभे राहण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. माजी आमदार श्री. बळीरामभाऊ शिरस्कर यांनी समाजातील लोकांनी हिंमत न हारता राजकीय क्षेत्रात प्रवेश करून मोठी पदे भूषवावीत, असे मार्गदर्शन केले.

यावेळी पांढरकवडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी केलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री. अशोकराव भेंडाळे यांचा तसेच सौ. आश्विनी निकोडे (नवनिर्वाचित नगरसेविका, मूल), सौ. जयश्री आतिष शेंडे (नवनिर्वाचित नगरसेविका, पांढरकवडा), सौ. शीलाताई पुंडलिक चौधरी (नगराध्यक्षा, झरी) व श्री. दिनेशभाऊ ठाकरे (कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, राळेगाव) यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याच प्रसंगी श्री. राजेंद्रभाऊ मांदाडे यांचा वाढदिवस त्यांच्या पत्नी व आई-वडिलांसह केक कापून कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अमोलभाऊ गुरनुले (विदर्भ प्रवक्ता) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. बबनभाऊ गुरनुले, श्री. प्रणित लेंडे, श्री. नागेशभाऊ मोहुर्ले, श्री. सुनील मोहुर्ले, बाबारावजी शेंडे, श्री. राहुल भेंडाळे व श्री. गणेश चहारे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. कु. प्रतीक्षा विठ्ठल गुरनुले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सुनीलभाऊ मोहुर्ले यांनी केले. या मेळाव्यास शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Back to top button