📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन डॉ. बाबासाहेब ओबेडकर विद्यालयामध्ये उत्साहात संपन्न !

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन डॉ. बाबासाहेब ओबेडकर विद्यालयामध्ये उत्साहात संपन्न !

बीड (प्रतिनिधी):- येथील आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष बी.एस. धुतालमल यांच्या शुभहस्ते अ‍ॅड.व्ही.बी.मगर आणि संचालक राम शिंदे, लक्ष्मण शिंदे, व्ही.जी.आव्हाड, सेवानिवृत्त मुख्याधापक बी.ए. हावळे व नवनिर्वाचीत मुख्याधापक एस.बी.मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब. आंबेडकर आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी शालेय परिसरात काढण्यात आली. या प्रसंगी शासनाच्या आदेशानुसार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अनुषंगाने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्राथमिक गटातून ‘बीड जिल्ह्याची मराठवाडा मुक्ती संग्रामात कामगीरी’ व माध्यमिक गटातून ‘बीड जिल्ह्यात सद्यास्थितीत असणारी आव्हाने आणि करावयाची कामगिरी’ या विषयावर कु.आरुषी धुतालमल, कु.पुजा भागवत, कु.आरती भागवत, चि. प्रदुम्न घुले, या विद्यार्थ्यांनी वकृत्व केले. या प्रसंगी माजी मु.अ तथा संचालक व्हि.जी. आव्हाड यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा या विषयावर आपले विचार प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर. बी. घुले (स.शि.), श्रीमती एन.जी मुंडे, श्रीमती शिंदे एस.एस. यांनी प्रयत्न केले. तसेच या प्रसंगी आनंद छात्रालयाचे अधिक्षक डी.व्ही. खरसाडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन पवळ यु.बी. यांनी केले व प्रास्ताविक शाळेचे मु.अ.एस.बी. मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन आर बी. घुले यांनी केले. या प्रसंगी शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी पालक उपस्थित होते.

Back to top button