बीड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे विचारवंत होते -प्रा. जयंत साठे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे विचारवंत होते -प्रा. जयंत साठे
बीड(प्रतिनिधी)ः   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वेगवेगळया विषयात संपुर्ण जगाला परिवर्तनाचे आदर्श तत्वज्ञान दिले  आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये वंचित, अल्पसंख्याक, दलित अस्पृश्य व महिला या समाजघटकाला न्याय देण्याचे काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्कृष्ट लेखक, अर्थशास्त्रज्ञ, समाजशात्रज्ञ, शिक्षणतज्ञ होते . भारत देशातील अस्पृश्य समाजातील त्यांनी भरीव काम केले. त्याकाळामध्ये अस्पृश्यांना मंदिर प्रवेश नव्हता. सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याचा अधिकार नव्हता म्हणून त्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले व महाडचे चवदार तळे सत्यागृह करुन सर्वांसाठी पाणी खुले केले. डॉ. बाबासाहेबांनी स्त्रियांना स्वातं देण्यासाठी ते कायदामंत्री असताना हिंदु कोड बील संसदेत सादर केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतीक दर्जाचे विचारवंत असल्यामुळे त्यांनी जगातील लोकशाही तत्वाचा संपुर्ण अभ्यास केला आणि भारत देशाला आदर्श लोकशाहीचे संविधान दिले. त्यामुळे भारतीय लोकशाहीत जगामध्ये आदर्श लोकशाही म्हणून ओळखली जाते. डॉ. बाबासाहेबांचा सामाजिक चळवळीमुळे समाजातील वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येता आले. शिक्षणाचा अधिकार कळल्यामुळे मागास समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आला. राजकीय तरतुदीमुळे राजकीय हक्क समाजिक घटकला ज्ञात झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत राजकारणामध्ये व त्यातुन सत्तेमध्ये विकासाच्या चाव्या आहेत. असे एवढे मोठे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीमध्ये केले. 14 आक्टोंबर 1956 रोजी त्यांनी नागपुर येथे बौध्द धम्माची दिक्षा घेतली व अस्पृश्यांना एक आदर्श  पर्याय निर्माण करुन दिला. असे प्रतिपादन महापरीनिर्वान दिना निम्मित्त प्रा. जयंत साठे यांनी केले.
यावेळी अभिवादन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.यावेळी उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळानकर, कमविचे उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पदव्युत्तर संचालक डॉ. खान ए.एस., पर्यवेक्षक श्री. जालिंदर कोळेकर यांची उपस्थिती होती.
याकार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दुष्यंता रामटेके तर आभार प्रा. प्रदिप साळुंके यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थिती होते.
Back to top button