📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे मावलाई राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे मावलाई राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
बीड (दि.०४) : गेवराई तालुक्यातील ब-हाणपुर येथील मावलाई युवक क्रीडा मंडळ व व्यायाम शाळेच्या वतीने पत्रकारिता, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी “मावलाई राज्यस्तरीय पुरस्कार” देऊन गौरविण्यात येते.
दि.०३ रोजी मावलाई देवी यात्रेनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात लिंबागणेश येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. ढवळे यांनी जिल्ह्यातील विविध जनतेच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गाने आंदोलने करत आवाज उठवून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भागवत वराट यांनी सांगितले की, गेल्या १९ वर्षांपासून अध्यात्म, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी यांनी केले.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. गणेश ढवळे यांच्यासह शेतीनिष्ठ शेतकरी कल्याण कुलकर्णी, प्रमोद कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, विकास उमापुरकर, दिनेश लिंबेकर आणि सुशील कुलकर्णी यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास शेख युनुस, धनंजय बजगुडे, गणेश शेंडगे, कुमार देशमुख, संतोष कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मावलाई राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल डॉ. गणेश ढवळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Back to top button