बीड

जयभवानीचे नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट—अमरसिंह पंडित

जयभवानीचे नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट—अमरसिंह पंडित
जयभवानी सहकारी साखर कारखान्याचा ४३ वा रोलर पुजन समारंभ संपन्न
गेवराई दि.९ (प्रतिनिधी):- जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४३ व्या गळीत हंगामाची संपुर्ण तयारी झाली असून या गळीत हंगामात नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात येत असल्याचे प्रतिपादन जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी कारखान्याचे रोलर पुजन करताना ते बोलत होते.
जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६व्या  गळीत हंगामाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने “रोलर पुजन” हा  पहिला टप्पा आज बुधवार दिनांक ९ जुलै २०२५ बुधवार रोजी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महंत जनार्धन महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, व्हा. चेअरमन भाऊसाहेब नाटकर, भवानी बॅंकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, उपसभापती विकास सानप, यांच्यासह संचालक कुमारराव ढाकणे, जगन्नाथ शिंदे, आप्पासाहेब गव्हाणे, राजेंद्र वारंगे, श्रीराम आरगडे, जगन्नाथ काळे, बाबुराव काकडे, नारायणराव नवले, शरद चव्हाण, सुनील पाटील, संदीपान दातखिळ, नंदकिशोर गोरडे, जगन्नाथ दिवाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, जयभवानी सहकारी साखर कारखान्याची  च्या ४३ व्या गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू असून  कारखान्याने मागील गळीत हंगामात ४ लाख ४१ हजार ५७१ मेट्रिक टन ऊस गाळप करून ३ लाख ९० हजार ३९० टन साखर उत्पादन झालेले आहे तर १०.४१ टक्के  सरासरी साखर उतारा आलेला आहे. आसवणी प्रकल्पामधून ६६.९० लाख बल्क लिटर एवढे बी-हेवी स्पिरीट उत्पादित झालेले आहे. गळीत हंगाम २०२५-२६ साठी कार्यक्षेत्रात १४ हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली असून त्यापासून अंदाजे १०.५० लाख मेट्रीक टन ऊस गाळपास उपलब्ध होईल.  बिगर नोंदीचा ४ हजार हेक्टर ऊस असून त्यापासून ३ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होणार असून एकूण १३.५० लाख मेट्रिक टन ऊस कारखाना कार्यक्षेत्रात उपलब्ध आहे. त्यापैकी कारखान्याने ९ लाख मेट्रिक टन गाळपाचे उदिष्ट ठरविलेले आहे. कारखान्याने ऊस तोड वाहतूक यंत्रणेची उभारणी चालू असून जसजसे तोडणी वाहतूक करार पूर्ण होत आहेत तसे यंत्रणेस पहिला हप्ता अदा करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी  हनुमान कोकणे, चंद्रकांत पंडित, गणपतराव राठोड, जयदीप औटी, फुलचंद बोरकर, उद्धव पैठणे, रावसाहेब काळे, बळीराम रसाळ, दिनकर काळे, सुभाषराव मस्के, किरण वावरे, कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप, चिफ इंजिनिअर अशोक होके,  चीफ इंजिनिअर ऋषिकेश देशमुख, प्रॉडक्शन मॅनेजर गजानन वाळके,  मुख्य शेतकी अधिकारी सुदामराव पघळ, मुख्य लेखापाल सौरभ कुलकर्णी, डिस्टलरी इनचार्ज राजेंद्र बडे,  डिस्टलरी इनचार्ज दिनेश बिरकुटे, चीफ केमिस्ट श्रीमंत जाधव, चिफ केमिस्ट सिव्हील इंजिनिअर भालचंद्र कुलकर्णी, सुरक्षा अधिकारी एस.एन.औटे, संगणक विभागाचे धनाजी भोसले, खरेदी विभागाचे सुशांत सोळंके, ऊस पुरवठा अधिकारी वच्छिष्ट कुटे, हेड टाईम किपर सचिन उधे, कार्यालयीन अधीक्षक गोविंद चव्हाण, केनयार्ड सुपरवायझर ज्ञानेश्वर जामकर,  स्टोअर किपर राजेंद्र ढेंगळे, डॉ. संभाजी पवार, उद्धव पारे, ऋषिकेश शिंदे, महेश गुंजाळ, विष्णु गायकवाड यांच्यासह कामगार, कर्मचारी, अधिकारी, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, कार्यक्रमास उपस्थित होते.
Back to top button