संपादकीय
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह
———————-
वै.वामन महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहा – महंत दत्ता महाराज गिरी
———————-
गेवराई :
भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव ,(ता.गेवराई) येथे भगवान कुंभेश्वर व भगवान गोरक्षनाथ महाराज यांच्या कृपेने वै.ब्रम्हनिष्ठ गुरुवर्य महंत वामन महाराज गिरी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त ह.भ.प महंत दत्ता महाराज गिरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.२९ फेब्रुवारी पासून ५३ वा अखंड हरिनाम सप्ताह व रामकथा प्रवक्ते जनार्दनजी महाराज अरावेकर यांच्या संगीत तुळशी रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत ह.भ.प. दत्तात्रय महाराज गिरी यांनी केले आहे.
या सप्ताहात गाथा भजन नेतृत्व सुदाम म. गवारे, अभिमन्यु म. गिरी, रामेश्वर म.चव्हाण, शिवाजी म.भोसले, श्रीराम म. पांगरे, पांडुरंग म.जाधव यांचे आहे. तसेच महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकारांची किर्तनसेवा होणार आहे. यामध्ये बुधवार दि.२९ जानेवारी रोजी दिनेश महाराज माने , गुरुवार दि.३० रोजी भरत महाराज जोगी , शुक्रवार दि.३१ रोजी चंद्रकांत महाराज खळेकर , शनिवार दि.०१ फेब्रुवारी जनार्दन महाराज आरावेकर , रविवार दि.२ रोजी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर , सोमवार दि.३ रोजी माऊली महाराज खडकवाडीकर, मंगळवार दि.४ रोजी महादेव महाराज राऊत ,तर बुधवार दि.५ फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत गुरुवर्य ह.भ.प.श्री दत्तात्रय महाराज गिरी यांचे दुपारी १ ते ३ या वेळेत अमृततुल्य काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महंत दत्तात्रय महाराज गिरी व व्यवस्थापक पंचक्रोशी परिसर श्री.क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ख्यातनाम भजन सम्राट यांच्या उपस्थितीत रंगणार संगीत भजन
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, येथे सप्ताहात ख्यातनाम कीर्तनकार, भजन सम्राट, गायक, वादक यांची हजेरी असते तर यावर्षी बुधवारी
पांडुरंग म. गोळेगावकर , सुवर्णाताई गिरी ,वैजनाथ कोकाटे , सुदर्शन खरात , गुरुवारी संगीतरत्न गोदावरीताई मुंढे , हरी भोसले, श्रीराम महाराज पागरे, शुक्रवारी भजन सम्राट राहुल खरे, शनिवारी संगीतरत्न कृष्णा म. ठाकर, तबलासाथ पवन उदे , रविवारी गानसम्राज्ञी भाग्यश्री देशपांडे , सोमवारी भजन सम्राट महेश कंठे, तबलासाथ कौस्तुभ तळेकर तर मंगळवारी संगीतरत्न डॉ.निरज लांडे यांच्यासह पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत सात दिवस संगीत भजन कार्यक्रम होणार आहे.
रामायणाचार्य जनार्दन महाराज अरावेकर यांची रामकथा
जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर रामकथेत मिळते म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य संगीत तुळशी रामकथा प्रवक्ते जनार्दन महाराज अरावेकर यांच्या सुमधूर वाणीतून दि.२९ जानेवारी ते दि.४ फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते १ या वेळेत येथे सात दिवस संगीत तुळशी रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी संगीत तुळशी रामकथेच्या श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.



