खर्डा जि.प.शाळेतील ; ९० राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात

खर्डा जि.प.शाळेतील ; ९० राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात
स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी हे भविष्यात अधिकारी बनतील – सरपंच संजिवनी पाटील
जामखेड प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील जि.प.शाळा खर्डा मुले व उर्दू शाळा या दोन्ही शाळेतील ९० राज्यस्तरीय गुणवंतांचा गुणगौरव सोहळा गुरुवार दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत संपन्न झाला.
यावेळी बोलताना सरपंच संजिवनीताई पाटील म्हणाल्या की,स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी हे भविष्यात अधिकारी घडतील.बालवयापासून स्पर्धा परीक्षा तयारी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवि सुरवसे,सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गोपाळघरे,केंद्रप्रमुख केशव गायकवाड,मुख्याध्यापक दत्ताञय आंधळकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज मिसाळ,राम निकम,विश्वस्त मुकुंदराज सातपुते,लेखक एकनाथ
चव्हाण, दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार,
ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे,राजू मोरे, बाळासाहेब गोपाळघरे,सुनील भामुद्रे, शशिकांत वैद्य,शिक्षक बँक माजी संचालक ज्ञानोबा थोरात,पोपट भुते,दिगंबर थोरात ,सविताताई विजयसिंह गोलेकर डाॅ.बिपीनचंद्र लाड ,डॉ.दत्तात्रय खोत,खलील भाई, गणेश सुळ ,उपाध्यक्ष संतोष काळे बाबूराव गिते,हुसेन बादशाह सर,लिटिल स्टार आयडियल स्कुल मुख्याध्यापिका स्वाती कुरमुडे,किशोर दुशी, बाळासाहेब शिंदे,धनसिंग साळुंके यांच्यासह पालक,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जि.प.प्रा.शाळा खर्डा मुले शाळेतील इ.दुसरीचा विद्यार्थी शिवराज अशोक जाधव याची बी.टी.एस.स्पर्धा परीक्षेतून इस्रो शैक्षणिक सहलीस विशेष विमान प्रवासासाठी निवड झाल्याने त्याचा ट्रॅव्हल बॅग व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.जि.प.शाळा खर्डा मुले व उर्दू या दोन्ही शाळेतील राज्यस्तरीय ९० गुणवंतांना ट्राफी सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.नवोदय व विविध स्पर्धा परीक्षेतील केंद्रातील गुणवंतांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.उपस्थित सर्व मान्यवरांनी खर्डा मुले व उर्दू शाळेच्या गुणवत्तेचे भरभरुन कौतुक केले. यावेळी चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. स्पर्धा परीक्षेत भरीव योगदान देऊन खर्डा शाळेचे नाव राज्यस्तरावर लौकीक करणारे आदर्श शिक्षक श्री.चंद्रकांत अरण्ये यांचा विद्यार्थी व पालकांनी मोबाईल फोन देऊन विशेष सन्मान केला. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, गुरुमाऊली, सदिच्छा मंडळ जामखेड यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खर्डा येथील मुख्याध्यापक दत्तात्रय आंधळकर यांना पंच भाऊ’पुस्तक ५ प्रती भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दत्ताञय आंधळकर, सूञसंचलन आदर्श शिक्षक चंद्रकांत अरण्ये तर आभार प्रदर्शन दिनकर मोहळकर यांनी मानले.



