📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सादिक इनामदार यांच्यावरचे खोटे गुन्हे मागे घ्या – नवीदोद्दीन सिद्दिकी

सादिक इनामदार यांच्यावरचे खोटे गुन्हे मागे घ्या – नवीदोद्दीन सिद्दिकी
माजलगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात व बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षणखधिकाऱ्यांचे बरेच दिवसापासून बरेच घोटाळे चालू असून देखील एका शिक्षणाधिकाऱ्यांचा घोटाळा धारूर चे सादिक इनामदार यांनी बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणचे शिक्षण संचालकांचे शिक्षकांचे व इतर घोटाळे शासनाला निर्देशनात आणून देण्यासाठी वेगळेवेगळे पद्धतीने उपोषण आंदोलन चे निवेदन अर्जद्वारे भ्रष्टाचार उघडा पाडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही शिक्षक व महिला शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप करून त्यांच्यावर शासकीय व राजकीय शक्तीचा उपयोग करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न हे शिक्षणाधिकारी करीत आहे. म्हणून पोलीस प्रशासनाने सदरील बीड जिल्ह्याचे शिक्षण व शिक्षणाधिकारी यांचे भ्रष्टाचार जनतेसमोर आणून शासनाचे निर्देशनात आणून देत असल्यानेच सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांच्यावर एक महिला शिक्षणाधिकारी यांनी षडयंत्राद्वारे खोटे गुन्हे दाखल केले आहे. म्हणून बीड पोलीस प्रशासनाने खोटे गुन्हे मागे घेऊन सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांना शिक्षणाधिकारी यांच्या षडयंत्रनेतून मुक्त करावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे माजलगाव तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन सिद्दिकी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
Back to top button