बीड

जामखेड येथे रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटी (शहर) ची स्थापना

जामखेड येथे रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटी (शहर) ची स्थापना

जामखेड प्रतिनिधी – सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या रोटरी क्लब, जामखेडच्या नवीन शहर कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून जामखेड शहरात विविध उपक्रम राबवून सामाजिक भान जपले जाणार असल्याचे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अहिल्यानगर विभाग रोटरी क्लब चे जिल्हा अध्यक्ष नितीन थाटे, अहिल्यानगर विभाग रोटरी क्लबचे गव्हर्नर डॉ.सुरेश साबू यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहर रोटरी क्लब ची दि.१६ जून २०२५ रोजी स्थापना व सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष डॉ.प्रशांत गायकवाड,उपाध्यक्ष अरुण उगले, सचिव विकास पवळ, कोषाध्यक्ष डॉ सादेख पठाण, सार्वजनिक प्रतिमा प्रमुख धनराज पवार, रोटरी निधी प्रमुख डॉ विकी दळवी, पर्यावरण संवर्धन प्रमुख डॉ.भरत देवकर, सार्वजनिक आरोग्य प्रमुख डॉ.अविनाश पवार, रोटरी प्रशासक विनायक राऊत तसेच कार्यकारी सभासद डॉ.फारुख आझम,सौ. डॉ.विद्या तोंडे, डॉ.पल्लवी सुर्यवंशी,डॉ.सुशिल पन्हाळकर, संभाजी मुळे, रघुनाथ मिसाळ, डॉ.सुहास सुर्यवंशी, आनंद राजगुरू, डॉ.प्रविण मिसाळ, डॉ. सागर शिंदे, संकेत ढाळे आशा एकुण २० सभासदांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी डॉ कल्याणराव काशिद यांनी रोटरी क्लब च्या पदाधिकारी व सभासदांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Back to top button