बीड

परिवर्तन इंग्लिश स्कूल पाली येथे वार्षिक स्नेहसंमेलन श्रोते मंत्रमुग्ध….

परिवर्तन इंग्लिश स्कूल पाली येथे वार्षिक स्नेहसंमेलन श्रोते मंत्रमुग्ध.

..बीड दि.11 (प्रतिनिधी) पाली पंचक्रोशीतील लहान बालकांना घरातून बाहेर पडून संस्कारमय इंग्रजीतुन शिक्षण मिळवण्यासाठी सामाजिक चळवळीतून स्थापन झालेली संस्था- स्वराज शिक्षण प्रसारक मंडळा अंतर्गत स्थापन झालेली परिवर्तन इंग्लिश स्कूल पाली, ता. जि. बीड येथे शालेय अभ्यासक्रमाबरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

तसेच याही वर्षी नियमाप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या कलेतून सामाजिक संदेश, नवनवीन नृत्य आणि नाटक सादर करण्यात आले. त्यामध्ये गणपती च्या गाण्याने सुरुवात, वेलकम या गाण्याने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, राधा कृष्णाची भूमिका, अनाथ आश्रमातील बहिण भावाची कहाणी, रमाबाई भीमराव आंबेडकर यांची कथा, संगीत गायन सुरांचा पूर, स्वच्छतेचा संदेश, द्रोणाचार्य व एकलव्य नाटक, व्यसनमुक्ती, गोरोबा कुंभाराची कथा, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या चित्रपटातील नृत्य, देशभक्तीपर गीत, त्याचबरोबर सामाजिक जोपासना ठेवण्यासाठी रमजान ईद चे औचित्य साधून हिंदू-मुस्लिम, सिख- ईसाई हम सब भाई-भाई चा संदेश देत “ईद मुबारक” अतिश्य बहारदार नृत्य विविध प्रकारच्या वेशभुषेत सादर करण्यात आले. त्याप्रसंगी कार्यक्रमा चे उद्घाटक मा.श्री. राजेंद्रजी मस्के (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी)कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. मंजुषा नवले (सरपंच-पाली) व श्री. महेंद्र वीर (उपसरपंच-पाली) प्रमुख पाहुणे मा. श्री. शिवाजी बंटेवाड साहेब (पो. नि. ग्रा. पोलीस स्टेशन, बीड), डॉक्टर प्रफुल्ल सुस्कर (बालरोगतज्ञ – श्री.वेदांत हॉ. बीड), मा. श्री. चंद्रसेन दादा नवले (माजी-उपसभापती), मा. श्री. विजयकुमार मस्के (विभागीय अधिकारी- श्री. छ.रा. शाहू बँक), मा. श्री. शरद गावडे (मॅनेजर-शाहू बँक), श्री. लक्ष्मण दादा नवले, डॉ. दत्ता सोळुंके, प्रा. राजेश वीर , श्री. आस्करभाई शेख, श्री. अंबादास गुजर (सरपंच-मंजेरी ह.), श्री. सुशेनजी खरसाडे (सरपंच-आ.वडगाव), श्री. तुळसीदास महाराज शिंदे (उपसरपंच-कोळवाडी) आणि यांच्यासह पाली पंचक्रोशातील सर्व माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, ग्रामसेवक, विविध पदावर कार्यरत असणारे अधिकारी, शेतकरी वर्ग, विशेष उपस्थिती शाळेचे सर्व पालक, त्याचबरोबर गावातील लहान थोर बालक, महिला, ग्रामस्थ, पत्रकार- रवींद्र भालेकर आणि प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन परिवर्तन इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अशोक लक्ष्मण शिंदे व संचालिका संस्थापक सचिव प्रा. सौ. श्रद्धा अशोक शिंदे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन श्री.अनिल भोसले सर व विद्यार्थिनी कु.अनुजा वीर आणि कु. सायली देशमाने यांनी केले. शाळेतील शिक्षिका सौ. स्वाती औटे , सौ. रोहिणी राऊत यांच्यासह संचालिका यांनी खूप मेहनत घेतली. याची पावती म्हणून शाळेतील पालक वर्ग व पाली पंचक्रोशीतील सर्व नागरिक यांच्याकडून शाळेचे खूप कौतुक करण्यात आले. हे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी पार पडण्यासाठी शाळेतील सर्व पालकांनी भरपूर सहकार्य केले त्याबद्दल सर्व पालकांचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानण्यात आले.

Back to top button