बीड

रणजित राऊत यांचा ग्रामीण आरोग्य प्रकल्प, जामखेडच्या वतीने गौरव

रणजित राऊत यांचा ग्रामीण आरोग्य प्रकल्प, जामखेडच्या वतीने गौरव

जामखेड (प्रतिनिधी): फक्राबाद येथील सुपुत्र आणि विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे रणजित रावसाहेब राऊत यांना संजीवनी विद्यापीठ, कोपरगाव येथे २९ मार्च रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत “युवा शास्त्रज्ञ पुरस्कार” प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामीण आरोग्य प्रकल्प, जामखेड यांच्या वतीने विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.

या प्रसंगी प्रकल्पाच्या संचालिका डॉ. शोभाताई आरोळे म्हणाल्या, “रणजित राऊत यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे. त्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे.”

आपले मनोगत व्यक्त करताना रणजित राऊत म्हणाले, “हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या शिक्षकांचा, मार्गदर्शकांचा आणि गावकऱ्यांचा आहे, ज्यांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला. ग्रामीण आरोग्य प्रकल्पाशी असलेली माझी नाळ मला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देते.”

या कार्यक्रमाला प्रकल्पातील समाजसेवक श्री. जयेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते श्री. मधुकर वाळुंजकर आदी उपस्थित होते. रणजित राऊत यांच्या या यशामुळे जामखेड तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उजाळले आहे.

Back to top button