📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पत्रकारितेसोबत सामाजिक कार्य; राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

पत्रकारितेसोबत सामाजिक कार्य; राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

‘अभिमान महाराष्ट्राचा’ पुरस्काराने दत्तराज पवार सन्मानित

जामखेड प्रतिनिधी: मी मुस्लिम मावळा शिवरायांचा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सन्मान कर्तुत्वाचा अभिमान महाराष्ट्राचा या पुरस्कार वितरण सोहळ्यात खर्डा येथील पत्रकार दत्तराज पवार यांना सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत दिलेल्या योगदानामुळे आदर्श व उत्कृष्ट पत्रकार २०२६ पुरस्कार शिक्रापूर जिल्हा पुणे येथे शिवजयंती उत्साहाचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी प्रमाणपत्र, ट्रॉफी, शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून पवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिश दरेकर, शिवव्याख्याते निलेश धुमाळ, पाटील मानस वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुरेश जाधव, कार्याध्यक्ष मनिषा वानखेडे, दत्ताभाऊ हरगुडे, सणसवाडी चे माजी सरपंच शिवाजी दरेकर, वैभव यादव, राजू दरेकर, सौ. मीनाताई गवारे, सिराजभाई शेख, आरिफभाई शेख, अमजदभाई पठाण, वैशालीताई नवले, माऊली गायकवाड, अँड. विलास जाधव, रामदास धुमाळ, सुनील पाडळे, पत्रकार प्रवीण वाघ, सोमनाथ नवले, सुधाकर लोखंडे, लक्ष्मण शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार दत्तराज पवार यांनी आजपर्यंत अनेक नेत्यांचे वाढदिवस व थोर पुरुषांची जयंतीच्या निमित्ताने अनेक वर्ष रक्तदान शिबिरे घेऊन आजपर्यंत ७२०० रक्त बाटल्या संकलित करून गरीब व गरजू रुग्णांना अल्प दरात दिल्या आहेत. खर्डा ग्रामपंचायतचे ते सलग दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करीत असताना शहराची एक कोटी रुपयांची अंतर्गत पाईपलाईनचे काम त्यांच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. ते अनेक लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, तसेच गेली ३० ते ३५ वर्षापासून पत्रकारीतेच्या क्षेत्रात काम करीत असताना अन्यायाच्या विरोधात लेखणीचा आवाज उठविला, समाजामध्ये जातीय व धार्मिक सलोखा वाढविण्यासाठी जनजागृती करण्याचे काम त्यांनी आपल्या लेखणीतून केले आहे. त्यांनी आजपर्यंत जामखेड रिपोर्टर, गावकरी, पुढारी, पुण्यनगरी, लोकनायक, जनता आवाज या वर्तमानपत्रात काम केले आहे. सध्या ते शिवपट्टण टाइम्सचे संपादक म्हणून काम करीत आहेत.
पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडून न्याय देण्याचे काम आपल्या दीर्घ पत्रकारितेच्या कार्यकाळात केले आहे. या सर्व कामाची दखल घेऊन मी मुस्लिम मावळा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने शिवजयंती उत्सव २०२६ रोजी शिक्रापूर, जिल्हा पुणे येथे सन्मान कर्तृत्वाचा “अभिमान महाराष्ट्राचा” या पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कामात अग्रेसर असलेले पत्रकार दत्तराज पवार यांना आदर्श व उत्कृष्ट पत्रकार हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना हा विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे खर्डा, जामखेड सहित समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. कार्यक्रमानंतर वृद्धाश्रमातील वृद्धांना ब्लॅंकेटचे व उपस्थिततांना मिठाई, अन्नदान, फळांचे वाटप यावेळी करण्यात आले.
शिवजयंती उत्सव व कार्यक्रमाचे आयोजक रिजवान बागवान यांनी प्रास्ताविक केले तर आभार मानस वृद्धाश्रमाचे संस्थापक सुरेश जाधव यांनी मानले.

Back to top button