बीड

सुरुडी आश्रमशाळेत शिवजन्मोत्सव जल्लोषात

सुरुडी आश्रमशाळेत शिवजन्मोत्सव जल्लोषात
सुरुडी (ता. आष्टी ): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सुरुडी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रकल्प अधिकारी चेतना मोरे, सहाय्यक प्रकल्पाधिकारी डॉ. उद्धव वायाळ, गजानन बनसोडे यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक सुधाकर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रकाश काडलिंगे, केतन काकडे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले.
 आकर्षक फलक लेखन केले,  महाराजांची देखणी रांगोळी, विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती इ उपक्रम राबवण्यात आले. विद्यार्थिनींनी ‘शिवबांचा पाळणा’ व नामकरण सोहळा सादर केला. यानंतर दुर्गपूजन करून शिवबांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन व भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिवजन्मोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराजांच्या मिरवणुकीसाठी शाळेत घोडा आणण्यात आला होता. कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाराजांची घोड्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर राठोड, प्रकाश काडलिंगे, राजेंद्र कांबळे, केतन काकडे, गोकुळ शिंदे, संगीता जाधव, भगवान बागुल, अमित पवार, विलास देवतुळे, मदन सावंत, स्वाती मळघणे, वेणूबाई केसकर, मोहन जाधव, संदीप ढेपे, संदीप पानबुडे, काशिनाथ खुडे, वंदना पानबुडे, पुण्यरथा खुडे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Back to top button