बीड

तांदळेश्वर विद्यालय तांदळवाडी घाट शाळेमध्ये स्नेहसंमेलन व पालक मेळावा उत्साहात संपन्न

तांदळेश्वर विद्यालय तांदळवाडी घाट शाळेमध्ये स्नेहसंमेलन व पालक मेळावा उत्साहात संपन्न

बीड प्रतिनिधी नवगण शिक्षण संस्था संचलित तांदळेश्वर विद्यालय तांदळवाडी घाट तालुका बीड या शाळेमध्ये आज सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला त्याचबरोबर पालक मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले होते सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आठवी नववी दहावी तिन्ही वर्गातल्या मुला मुलींनी लेझीमाच्या तालावरती विविध गाण्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले सर्व विद्यार्थ्यांना फेटे बांधण्यात आले होते त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लावणी ग्रुप डान्स सोलो डान्स कोळी डान्स इत्यादी विविध महाराष्ट्राच्या जी परंपरा आहे ती परंपरा प्रत्येक विभागाच्या गाण्याचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी व प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक श्याम डाके सर व त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर तांदूळ वाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक क्षीरसागर सर व त्यांचे सर्व सहकारी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले अशी माहिती श्याम डाके यांनी दिली
या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिकांमध्ये सरपंच बळीराम शेठ शिरसाट उपसरपंच महादेव अण्णा खोसे ग्राम पंचायत सदस्य शहादेवराव खोसे दुसरे ग्रामपंचायत सदस्य अनिल खोसे माजी मुख्याध्यापक एस आर खोसेसर उर्फ आबा आदरणीय पांचाळ तात्या पोलीस पाटील दिगंबर रावजी खोसे माजी उपसरपंच पिंटू शेठ उर्फ श्रीकृष्ण भागडे दिनकर रावजी शिरसाट चेअरमन संजय जी खोसे बापूराव शिरसाट रामहरी खोसे साहेब त्याचबरोबर बंडू खोसे जि प प्रा शाळा अध्यक्ष यांची उपस्थिती होती त्याचबरोबर काळे फौजी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन  मिलिंद जगताप राजेंद्रजी टेकडे सुंदर तात्या खोसे त्याचबरोबर केंद्रीय मुख्याध्यापक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय विजय रावजी खोसे सर संदीप जी भागडे हे ही आवर्जून उपस्थित होते अनेक मान्यवरांनी सढळ हाताने या विद्यार्थ्यांच्या अभिनयाला दात देऊन बक्षीस दिली विद्यालयाने सुद्धा विविध कार्यक्रमांमध्ये चित्रकला स्पर्धा स्टुडन्ट ऑफ द इयर वर्षभरातल्या अनेक स्पर्धा चे बक्षीस वितरण विद्यालयाकडून करण्यात आले
याप्रसंगी अंधापुरीचे सरपंच श्री पप्पू जी जगताप व त्यांच्या धर्मपत्नी मनिषा जगताप सरपंच उपस्थित होत्या
या कार्यक्रम प्रसंगी महिलांची संख्या लक्षणीय होती व पंचक्रोशीतील अंधापुरी घाट तांदळवाडी घाट व पंचक्रोशीतील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली
डॉल्बीच्या तालावर व लेझीमच्या तालावर बहारदार कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात आला सुशोभीकरण मैदानाचे व कार्यक्रमाचे स्टेज देखणीय होते
प्रस्ताविक करताना मुख्याध्यापक डाके सरांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे पालकांनी सर्वांनी सहकार्य करावे शाळा प्रगतीच्या दिशेने आपली वाटचाल करत आहे यामध्ये सुशिक्षित पालकांचा सहभाग नेहमी असावा असे मत त्यांनी व्यक्त केले
शेवटी पालक प्रतिनिधी म्हणून महादेव अण्णा खोसे उपसरपंच यांनी आपल्या मनोगतामध्ये जिल्हा परिषद शाळा व तांदळेश्वर विद्यालय दोन्हींचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप कौतुक केले तुम्ही काम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली व सर्व शिक्षकांचा त्यांनी व गावकऱ्यांनी सत्कार केला
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली व सर्व मान्यवरांच्या आभार डाके सर यांनी मानले डाके सर् त्यांच्या टीमने सर्व नागरिकांना नाश्ता व चहापाण्याची सोय केली होती
या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनीच मोलाचे सहकार्य केले व कार्यक्रम संपविण्यात आला

Back to top button