📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बीड (प्रतिनिधी): देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल, बीड येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्रांगणात विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात माजी पीएसआय मा. के. डी. भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील धर्मादाय आयुक्त मा. बी. जे. गायकवाड तसेच शाळेच्या प्राचार्या उमा जगतकर उपस्थित होत्या.

यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे, कविता व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मान्यवरांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी शिस्त, राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन केले.

यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व स्मृतीचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री पवार यांनी केले, तर आभार राजश्री पवार यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button