बीड

मिल्लिया महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

मिल्लिया महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
बीड: येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाला 26 नोव्हेंबर 2024 रोजी 75 वर्षे पूर्ण झाले यानिमित्ताने देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क व कर्तव्याची जाणीव व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी 2025 या महिन्यात संविधान गौरव महोत्सव आयोजन करण्यात आलेला होते. त्या निमित्ताने मिल्लिया महाविद्यालयात भारतीय संविधान या विषयावर ऑनलाईन व्याख्यान, निबंध स्पर्धा , भिंती पत्रक स्पर्धा, प्रश्नमंजुषा असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन व्याख्यानात कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार, लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल जाधव यांचे व्याख्यान झाले. ऑनलाईन प्रश्नमंजुषा मध्ये 155 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, भिंतीपत्रक स्पर्धांमध्ये 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या भिंती पत्रकाचे उद्घाटन स्वा. सावरकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहास मोराळे यांच्या हस्ते करण्यात आले. निबंध स्पर्धेत देखील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संविधान गौरव महोत्सव निमित्त महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.फारोखी खय्यूम, डॉ. शेख गफूर अहमद, राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रोफेसर मिर्झा असद बेग, डॉ. शेख रफिक , डॉ रमेश वारे यांनी परिश्रम घेतले. संविधान गौरव महोत्सव या संपूर्ण कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Back to top button