बीड

आदित्य पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाणी शुध्द करण्याचे तंत्रज्ञान

आदित्य पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाणी शुध्द करण्याचे तंत्रज्ञान
बीड पालिकेच्या ईट येथील जलशुद्धीकरण केंद्राला दिली शैक्षणिक भेट, शहराला पाणी पुरवठा करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी केली आत्मसात
प्रतिनिधी | बीड;-आदित्य शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिक ज्ञानावर भर दिला जातो. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बीड नगर पालिकेच्या इट येथील जलशुध्दीकेंद्राला भेट देऊन तेथील पाणी शुध्द करण्यापासून तर ते पाणी शहरातील नागरिकांच्या घरात पोहोचण्यापर्यंतची सर्व तांत्रीक पध्दत अवगत करून घेतली. जलशुद्धीकरण केंद्रातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आदित्य पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी नगर परिषद बीड अंतर्गत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्र ईट येथे  संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्रजी सारडा, संचालक डॉ.आदित्य सारडा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या कार्यकारी सदस्या तथा आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा, आदित्य पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल खडके यांच्या मार्गदर्शनाखाली भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे दुधाळ पी. डी., खालापुरीकर जी. एम., मुंडे ए. आर., वरपे आर. एस. यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांनी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शुद्ध कसे केले जाते. त्यामध्ये कोणत्या प्रक्रिया असतात तसेच पाणीपुरवठा कसा केला जातो आणि त्याचे नियोजन कसे करावे या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यामध्ये तेथील जलशुद्धीकरण केंद्र हे २४ आणि २५ दशलक्ष लिटर क्षमतेचे आहे. हे पाणी माजलगाव येतील बॅक वॉटर मधून पाइपलाइन द्वारे येते. विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा २४ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जुन्या प्लॉंट ला भेट दिली. प्रथम त्या पाण्याला Areation ह्या प्रोसेस मधून जावे लागते व यावेळी त्यामध्ये वातावरणाशी संपर्क होऊन ऑक्सिजन आणि Alum म्हणजेच तुरटी मिळवली जाते, त्यामुळे त्यातील कार्बन डायऑक्साइड नष्ट होतात. नंतर एका २० फूट खोल टाकीमध्ये जी निमुळती आकारामध्ये असते अश्या टाकीमध्ये पाणी जमा केले जाते. तिथे Sedimentation ची प्रक्रिया होते. ज्यामध्ये पाणी २४ तास स्थिर ठेवून त्यातील गाळ बाहेर काढला जातो. ह्या प्रक्रियेमध्ये पाणी जवळपास ७५ टक्के पर्यंत शुद्ध होते. त्यानंतर वाळू Filters द्वारे पुन्हा त्याचे शुद्धीकरण केले जाते यामध्ये आपण Rapid Sand Filter चा वापर करतो तसेच हे Sand Filter याची दररोज वॉशिंग केली जाते. सर्वात शेवटी ते पाणी Storage Tank मध्ये जमा करून त्यामधे ब्लिचिंग पावडर मिक्स करून ४९० HP पॉवर च्या ५ पंपाकडून शहरासाठी पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्राची ही प्रक्रिया २४ तास चालू असते आणि काही बिघाड होऊ नये तसेच स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतली जाते. नवीन प्लॉंट हा २५ दशलक्ष लिटर क्षमतेचा आहे. नवीन प्लॉंट मध्ये हे सर्व कामे संगणक प्रक्रियेद्वारे स्वयंचलित होतात आणि विशेष करून सौरऊर्जेवर आधारित आहे त्यामुळे विजेचा खर्च देखील कमी होतो. तेथील प्रभारी अधिकारी हाडुळे, आमटे, सचिन ठोकरे यांनी विद्यार्थांना सखोल मार्गदर्शन केले. जलशुद्धीकरण केंद्राची पूर्णपणे माहिती दिली.

परिक्षेत्र भेटीतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आदित्य शिक्षण संस्थेत सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना ज्ञानात मोठी भर पडते. आदित्य पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बीड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला दिलेल्या भेटीतून जलशुद्धीकरण केंद्राची स्वायंचलीत, मानवी संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली. या भेटीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होणार आहे.
-     डॉ. राहुल खडके, प्राचार्य, आदित्य पॉलिटेक्निक, महाविद्यालय, बीड

Back to top button