“जनतेचा आमदार – थेट संवादातून दिलासा” “आळंदीकरांचा आवाज – बाबाजी काळेचं जनसंवाद अभियान गाजलं”

“जनतेचा आमदार – थेट संवादातून दिलासा”
“आळंदीकरांचा आवाज – बाबाजी काळेचं जनसंवाद अभियान गाजलं”
पुणे /:-आळंदी माऊलींच्या नगरीत शनिवारी आमदार बाबाजी काळे यांनी जनतेच्या विविध प्रश्नांना थेट वाचा फोडण्यासाठी जनसंवाद अभियान राबवले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आमदार काळे यांनी या अभियानाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “जनतेचे प्रश्न जाणून घेणे, त्यावर तातडीने उपाययोजना करणे आणि शासनाकडे पाठपुरावा करून तोडगा काढणे” हेच आपले ध्येय आहे.
या संवाद कार्यक्रमात नागरिकांनी पाणीपुरवठा, आळंदी ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था, वेशीवरील कचरा समस्या, विजेचा लपंडाव, पार्किंगची टंचाई, सार्वजनिक आरोग्य सुविधा, वाहतुकीची कोंडी, इंद्रायणी नदीचे प्रदूषण, दर्शनबारीतील अडचणी, मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव असे अनेक तातडीचे मुद्दे मांडले.
अनेकांनी शासकीय योजनांचा लाभ मिळवताना येणाऱ्या अडचणींचीही तक्रार केली. यावर आमदार काळे यांनी नागरिकांचे सर्व प्रश्न काळजीपूर्वक ऐकून घेतले. काही तक्रारींवर त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तर मोठ्या समस्यांसाठी स्वतंत्र बैठका घेऊन निर्णय होईल, असेही स्पष्ट केले.
“जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांची खरी गरज समजून घेणे हे माझे कर्तव्य आहे. निवडणुकीपुरते नव्हे, तर सतत जनतेच्या सेवेत राहणे हाच माझा संकल्प आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.
या कार्यक्रमाला बबनराव कुऱ्हाडे, रोहीदास तापकीर, डि.डि. भोसले पाटील, सचिन गिलबिले, रमेश गोगावले, प्रशांत कुऱ्हाडे, अविनाश तापकीर, विलास कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, संदीप नाईकरे पाटील, आशिष गोगावले, मनोज पवार, अनिकेत डफळ, मंगेश तिताडे, नंदकुमार वडगांवकर, शशीराजे जाधव, अनिताताई झुजम, स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
गोरगरीब जनतेचा मनातील आमदार म्हणून ओळख असलेले बाबाजी काळे रस्त्यावरही लोकांसोबत गप्पा मारताना, चहापाणी करताना दिसतात. त्यामुळे “जनतेशी नाळ जुळवलेला आमदार” अशी त्यांची खास छाप या संवादातून पुन्हा अधोरेखित झाली.
जनतेच्या थेट संवादातून नोंदवलेले मुद्दे निश्चितच सोडवले जातील, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.



