बीड

शिक्षणाचं शस्त्र हाती घेऊनच समाज परिवर्तन शक्य – डॉ.संजय भोरे

शिक्षणाचं शस्त्र हाती घेऊनच समाज परिवर्तन शक्य – डॉ.संजय भोरे

स्व.एम.ई भोरे ज्युनियर कॉलेज येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

जामखेड प्रतिनिधी – छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून अज्ञानाच्या काळोख्यातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेले.ते केवळ आरक्षणाचे शिल्पकार नव्हते तर आधुनिक महाराष्ट्राचे ही शिल्पकार होते.शिक्षणाचं शस्त्र हाती घेऊनच समाज परिवर्तन शक्य असे प्रतिपादन जामखेड तालुका शिक्षण संस्था तथा सनराईज् शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय भोरे यांनी केले.
जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज् मेडिकल & एज्युकेशन फौडेशचे स्व.एम.ई भोरे ज्युनिअर कॉलेज येथे आज दि.२६ जून २०२५ रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जामखेड तालुका शिक्षण संस्था तथा सनराईज् शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय भोरे होते तर संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या सौ.अस्मिता जोगदंड/भोरे, संचालक प्रा.तेजस भोरे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बारावी विज्ञान व कला शाखेतील विद्यार्थ्यांनी, श्रेया जगताप,अंजली भोंडवे, साक्षी पवार,श्रुती कांबळे, या विद्यार्थिनींनी शाहू महाराज यांचे विचार मांडले.” शिक्षणाशिवाय कोणते यश मिळत नाही आणि स्त्रियांना मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती आणि समानतेची संधी मिळते.याचे श्रेय शाहु महाराजांना जाते असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा.विनोद बहिर,प्रा.नारायण आयकर,प्रा.स्वाती पवार मॅडम, प्रा. प्रदीप भोंडवे,प्रा.दादासाहेब मोहिते, प्रा.छबिलाल गावित, प्रा.विवेक सातपुते यांनी शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे जे आपण जग बदलण्यासाठी वापर करू शकतो.
या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कला,क्रीडा,विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना घडवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महामानवांचे कार्य आणि विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी हे काॅलेज कार्यरत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुनील घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन कु.ऐश्वर्या वटाणे हिने मानले. यावेळी ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button