बीड

वैभवी संतोष देशमुख च्या हस्ते चिंचाळा राघापूर ग्रामपंचायतचे ध्वजारोहण स्वातंत्र्यदिनी गावामध्ये विविध उपक्रमआष्टी ।

वैभवी संतोष देशमुख च्या हस्ते चिंचाळा राघापूर ग्रामपंचायतचे ध्वजारोहण स्वातंत्र्यदिनी गावामध्ये विविध उपक्रमआष्टी ।
प्रतिनिधी :-स्वातंत्र्यदिनानिमित्त आष्टी तालुक्यातील चिंचाळा राघापूर ग्रामपंचायत चे ध्वजारोहण मस्काजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी  वैभवी देशमुख च्या हस्ते करण्यात आले  . वैभवी संतोष ध्वजारोहणासाठी उपस्थित राहून चिंचाळा गावच्या अभिमानात भर टाकली आहे. खरंच संघर्ष आणि त्यातून मिळालेले यश हे खूप मोठं असतं  आपलं गाव बघून मला माझ्या वडिलांची आठवण आली माझ्या वडिलांनी सरपंच असताना कधीच स्वतःच्या हस्ते ध्वजारोहण केले नाही स्वतंत्र सैनिक किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करायचे माझ्या वडिलांचे असे म्हणणे होते राजकारण आणि निवडणूक ही एक महिन्यासाठी असते ते तिथेच सोडून देऊन गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे ते नेहमी म्हणायचेआज स्वतंत्र  दिन आहे परंतु खरंच आपण स्वतंत्र झालेत का ज्याप्रकारे माझ्या वडिलांची अमानुषपणे हत्या करण्यात आली ते लोक कोणत्या विचाराचे होते आणि खरेच आपण स्वातंत्र्य झालेत का माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे जोपर्यंत माझ्या वडिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सर्व आमच्या सोबत राहाल असा मला विश्वास आहे . असे वैभवीदेशमुख म्हणालीसरपंच पंडित पोकळे यांनी केलेलं काम हे गावा अभिमानाचे  आहे. सरपंच  यांनी ध्वजारोहणासाठी १३ तारखेला गावातील ज्येष्ठ  नागरिक भाऊसाहेब सत्यबापू पोकळे व सिद्धीनाथ बाबा पोकळे यांच्या हस्ते केलेतसेच १४ तारखेला ग्रामसेवक निशा आदक व ग्रामपंचायतचे कर्मचारी ग्रामरोजगार सहाय्यक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर १५ ऑगस्ट रोजी . स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण वैभवी देशमुख यांच्या हस्ते करून गावातील गुणवंतांचा देखील गुणगौरव  वैभवी देशमुख व धनंजय भैया देशमुख सागर धस यांच्या हस्ते  करण्यात आला . जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेचे ध्वजारोहण  सागर धस यांच्या हस्ते करण्यात आले  यावेळी बोलताना सागर धस म्हणाले गावाच्या विकासासाठी सर्व गट्ट तट विसरून  एकत्र आले पाहिजे राजकारण बाजूला ठेवून विकास कामासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे विकास कामासाठी जो  निधी लागेल तो निधी कधीही कमी पडू दिला जाणार नाही शाळेच्या खोल्यांसाठीही लवकरच प्रयत्न करून निधी उपलब्ध करूअसे सागर धस आपल्या भाषणामध्ये म्हणाले  वीस वर्ष सैन्य दलामध्ये सेवा करून काही दिवसापूर्वी सेवानिवृत्त झालेलेराजू सुखदेव पोकळे व, राजू वसंत पोकळे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला तसेच आयटी कंपनीमध्ये निवड झालेला वैभव बबन पोकळे तसेच डॉ. शुभांगी सोमीनाथ पोकळे  यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे चिंचाळा / राघापूर गावासह परिसरातील नागरिकांचे सरपंच पंडित पोकळे यांनी आभार व्यक्त केले तसेच देशमुख कुटुंबीयांच्या चालल्या न्याय हक्काच्या लढ्याला चिंचाळा गावचे शेवटपर्यंत सहकार्य साथ असेल असाही शब्द सरपंच पंडित पोकळे यांनी यावेळी दिला…
(चौकट)
सरपंच संतोष देशमुख यांचं कार्य प्रेरणादायी म्हणून वैभवी देशमुख ध्वजारोहणासाठी : सरपंच पंडित पोकळे
स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख फक्त सरपंच नव्हते ते महाराष्ट्रातील सरपंचाला प्रेरणादायी उदाहरण होते. त्यांनी केलेलं कार्य खूप मोठं होतं ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांची झालेले निर्घुण हत्या ही निंदनीय आहेच पण मानव जातीला काळिंबा फासणारी आहे. त्यांच्या पश्चात न्याय हक्कासाठी त्यांच्या मुलीने म्हणजे वैभवीने केलेला संघर्ष हा खूप मोठा आहे त्यातून मिळालेले यश हे उल्लेखनीय  आहे. म्हणूनच वैभवी देशमुखच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले व त्यांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान करण्यात आला ही आमच्या गावासाठी अभिमानाची बाब आहे.. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या धनंजय भैया देशमुख आणि वैभवी संतोष देशमुख, सागर आप्पा धस यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
– सरपंच पंडित पोकळे सरपंच चिंचाळा/राघापूर ग्रुप ग्रामपंचायत या कार्यक्रमासाठी  उप सरपंच ज्ञानेश्वर पोकळे जालिंदर पोकळे राधाकिसन पोकळे ग्रामपंचायत  कर्मचारीशाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थीविद्यार्थी अंगणवाडी सेविका ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
Back to top button