बीड
लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त संगीतमय भागवत कथा सप्ताह धार्मिक उत्साहात संपन्न

लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त संगीतमय भागवत कथा सप्ताह धार्मिक उत्साहात संपन्न
—-
लिंबागणेश:- (दि.१७)बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक महोत्सवानिमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह (दशम स्कंध) उत्साहात पार पडला. दि. ८ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या धार्मिक सोहळ्याची सांगता दि. १६ ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनाने झाली.
सप्ताहभर सकाळी पारायण, दुपारी उटी-उपहार, सायंकाळी आरती-प्रवचन आणि रात्री भागवत कथा असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प.पू. महंत श्री ओंकार व्यास बाबा शास्त्री महानुभव ( श्रीक्षेत्र पांचाळेश्वर ता.गेवराई जि.बीड )यांच्या प्रवचनाने भाविकांना अध्यात्मिक अनुभव मिळाला.
समारोप प्रसंगी पोहीचा देव संस्थानचे महंत रंगनाथभाऊ वायंदेस्कर, महंत विश्वनाथ बाबा, तसेच पंचक्रोशीतील महानुभव भाविक उपस्थित होते. भजनी मंडळींमध्ये मृदंगवादक संदीप आमटे,पांडुरंग वाणी, बाजीराव दशमे, बारीक ढास ,सतिश शिंदे आदींनी सुरेल भजनांनी वातावरण भारावून टाकले.
शुक्रवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्मानंतर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
या धार्मिक सोहळ्यासाठी मंदिराचे पुजारी विजय पाटोदेकर, राजेभाऊ आप्पा गिरे, कल्याण वाणी, सरपंच बालासाहेब जाधव, गोवर्धन गिरे, रामकिसन गिरे, अर्जुन गिरे, सुदाम रणखांब, विनायक वाणी, विक्रांत वाणी, संतोष भोसले, विठ्ठल कदम, रणजित भोसले, बसवंता खाडीलकर आदी मान्यवर व गावकरी यांनी परिश्रम घेतले.
काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि सप्ताहाचा समारोप भक्तीमय वातावरणात झाला.



