संपादकीय

अजित दादा शेतकऱ्यांची रक्तवाहिनी असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक पूर्ववत सुरू करा.

अजित दादा शेतकऱ्यांची रक्तवाहिनी असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक पूर्ववत सुरू करा.

 बीड प्रतिनिधी:- नव्या राजकारणात अजित दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले दादा हे आमच्यासाठी नवीन नाही, निजामाच्या राजवटीत खाली मान घालून जगायचे आम्हाला सवय होतीच यापूर्वी पण श्री शंकरराव कोल्हे, डॉक्टर दिग्विजय खानविलकर, बबनराव ढाकणे, विक्रम सिंह पाटणकर, विलासराव देशमुख, बबनराव पाचपुते, मधुकरराव किंमतकर सह अनेक पालकमंत्री बीड जिल्ह्याच्या बाहेरचे झाले आमच्यासाठी तुम्ही नवीन नाहीत पण या पालकमंत्र्यांनी फक्त वेळ मारून नेले तशी वेळ तुम्ही आणू नका आमच्या जिल्ह्यात गेली पंधरा वर्षापासून जिल्हा बँक बंद पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला पीक कर्ज वेळेवर मिळत नाही. अनेकांनी कोट्यावादी रुपये बँकेत ठेवी ठेवले आहेत. त्यातला दमडाही देत नाहीत दादा प्रगत महाराष्ट्राचे नेतृत्व तुम्ही करत आहात आता आलाच आहेत तर बँक सुरू करा अशी विनंती किसान संघाची समितीच्या वतीने प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केले आहे. दादा एकही जड उद्योग जिल्ह्यात नाही केंद्रातील तुमचे वजन वापरून रेल्वे कोच फॅक्टरी चा प्रस्ताव केंद्राकडून मंजूर करून घ्या इतिहास घडवा लाख  पन्नास बेरोजगारांना काम मिळेल. दादा एक तरी पंचतारांकित एमआयडीसी मंजूर करा आम्हाला विमानाची धावपट्टी नको जालना बीड तुळजापूर ही रेल्वे मंजूर करून बजेटची तरतूद करा महाराष्ट्रातील एक मागास जिल्हा आहे येथे बारामती पॅटर्न राबवा इथला ऊस तोडणारा तुम्हाला आशीर्वाद देईल आलातच आहात तर तुमची ख्याती काम करण्याची आहे सकाळी सहा वाजता मंत्रालयात बसणारा एकमेव मंत्री म्हणून तुमची नोंद आहे दादा एकही सोयाबीन केंद्र सुरू नाही बारदाना नाही म्हणून मापे झाली नाहीत हमी भावाप्रमाणे खरेदी झाली नाही. दादा 2014 ते 2024 या कालखंडात महाराष्ट्रात 2500 च्या आसपास आत्महत्या झाल्या आहेत. तुमच्या महाराष्ट्रात आत्महत्या होत नाहीत. मराठवाड्याच्या आणि त्यात बीड जिल्ह्याच्या पाचवीला दुष्काळ पडला आहे आवर्षणग्रस्त म्हणून कोठेही आमची नोंद नाही तुमच्याकडे आम्ही अवर्षणग्रस्त तालुका म्हणून रोडवर बोर्ड बघतो. शेतकऱ्याचा  दोन वर्षापासून माल घरात भाव नाही म्हणून पडून आहे दादा प्लीज हमी केंद्रांना बारदाना पुरून मुदतवाढ द्या आता फक्त इतकेच करा.
Back to top button