सनराईज् शैक्षणिक संकुलात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सनराईज् शैक्षणिक संकुलात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
जामखेड प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज् शैक्षणिक संकुलात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत आणि पसायदानाच्या गजरात परिसर देशभक्तीच्या भावनेने दुमदुमून गेला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सनराईज् मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे राजेंद्र पवार यांनी शाळेसाठी ५०,००१ रुपयांची मदत जाहीर केली. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणाच्या महत्त्वाबाबत प्रेरणादायी संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर कार्यक्रमांनी उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाश्रू दाटवले. विशेषतः लहान मुलांनी सादर केलेल्या ‘स्वातंत्र्यसैनिकांचे अभिनय’ या नाट्यप्रयोगाला टाळ्यांचा कडकडाट मिळाला. इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन प्रा. सुनील घाडगे यांनी केले. शेवटी ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या सोहळ्यास सनराईज् मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड/भोरे, संचालक प्रा. तेजस भोरे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष कदम, अविनाश भोगल, दादासाहेब कात्रजकर, रमेश भोगल, सचिन भोगल, विकास कार्ले यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.



