📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

ल.ना. होशिंग विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

ल.ना. होशिंग विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

एनसीसी विद्यार्थ्यांचा सत्कार
, सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगला स्वातंत्र्य दिन

जामखेड प्रतिनिधी :जामखेड शहरातील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना. होशिंग विद्यालय येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी परेड करून तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली व संचलन सादर केले.

यानंतर एनसीसी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, नृत्य, भाषण आदींचे आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सचिव अरुण चिंतामणी, खजिनदार डॉ. सुनील कटारिया, शशिकांत देशमुख,उपप्राचार्य प्रा.युवराज भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पुराणे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक अनिल देडे,माजी प्राचार्य अनंता खेत्रे,राजेश मोरे, कलाशिक्षक मुकुंद राऊत, बबन राठोड, भरत लहाने, किशोर कुलकर्णी, राघवेंद्र धनलगडे, एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे, नरेंद्र डहाळे, विशाल पोले, साईराज भोसले, आदित्य देशमुख यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button