मुंबई

राकेश टिकैत यांचे मोदी सरकारला आव्हान २६ नोव्हेंबर पर्यंतची दिली डेडलाईन

 

नवी दिल्ली | केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकलारी मागच्या दीड वर्षांपासून आंदोलन करत असून अनेकदा या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते तसेच या आंदोलनाला संपूर्ण देशब्स्थरातून पाठिंबा दर्शवण्यात आला होता. मात्र अद्यापही हे कायदे रद्द करण्यात आलेले नाहीये याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता वाढवली आहे आहे. त्याच पाठोपाठ केंद्र सरकारने येत्या २६ नोव्हेंबर पर्यंत कृषी कायदे रद्द करावेत अन्यथा आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.

टिकैत यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारला २६ नोव्हेंबर पर्यंत वेळ आहे. तो पर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर २७ नोव्हेंबर पासून आम्ही दिल्लीच्या सीमांवरील नाकाबंद आम्ही वाढवणार आहोत. त्या दिवसांपासून अनेक शेतकरी आपल्या गावांतून ट्रॅक्‍टर द्वारे दिल्लीच्या सीमेवर पोहचतील. शेतकऱ्यांनी या कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सिंघु, टिकरी आणि गाझीपुर सीमांवर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनाला २६ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पुर्ण होत आहे. शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी या आंदोलनासाठी संयुक्त किसान मोर्चा नावाची एक संघटना स्थापन केली असून त्यामार्फत हे आंदोलन सुरू आहे. आम्ही आमच्या छावण्या अधिक मजबूत करून त्याला किल्ल्याचे स्वरूप देऊ असेही त्यांनी म्हटले आहे. हा तिढा सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या अकरा फेऱ्या झाल्या आहेत. पण त्यातून हा तिढा सुटलेला नाही.

Back to top button