बीड

आंबेडकरी विचारधारा तळागाळात पोहोचविण्याचे काम रिपाइं कार्यकर्त्यांनी करावे:उदघाटकांचे आवाहन

आंबेडकरी विचारधारा तळागाळात पोहोचविण्याचे काम रिपाइं कार्यकर्त्यांनी करावे:उदघाटकांचे आवाहन

कुमसी येथील रिपाइं नामफलकाचे राजू जोगदंड, किसन तांगडे यांच्या हस्ते उदघाटन

 

 

बीड/प्रतिनिधी:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देऊन या देशातील तमाम उपेक्षित समूहातील समाज बांधवांना आपल्या हक्क व अधिकारासाठी लढा उभारण्याची ताकद निर्माण करून दिली. आंबेडकरांना अपेक्षित असलेली चळवळ गतिमान करण्यासाठी युवकांनी संघटित होऊन आंबेडकरी विचारधारा तळागाळात पोहोचविण्याचे काम करावे. असे आवाहन रिपाइंचे जिल्हा सहचिटणीस राजू जोगदंड, रिपाइंचे बीड तालुकाध्यक्ष किसन तांगडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइं बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मौजे कुमसी ता.जि. बीड या गावी रिपाइं नामफलकाच्या उदघाटनाप्रसंगी केले.

अंधश्रद्धा, रुढी व परंपराच्या खाईत खितपत पडलेल्या उपेक्षित समूहातील समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या संघर्ष नायक विश्ववंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशीच बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाच्या शाखेची स्थापना करणे हेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन.

यावेळी प्रा. फुलचंद लुचारे, बाळासाहेब ठोंबरे, रामेश्वर खळगे, संदेश मस्के, मिठू वाघमारे, ऋषी धुताडमल, कैलास जोगदंडसह रिपाइं कार्यकर्ते व कुमशी गावातील सर्व समाज बांधव उपस्थित होते.

शाखा कार्यकारणी कुमसी ता.जि. बीड

शाखाध्यक्ष सौरभ वाघमारे, उपाध्यक्ष गौतम वाघमारे, सचिव दुशांत वाघमारे, सहसचिव राहुल भिसे, संघटक रवींद्र भिसे, कोषाध्यक्ष मंगेश वाघमारे, सदस्य समाधान वाघमारे, सचिन वाघमारे, तुषार वाघमारे, नितीन वाघमारे, विकी वाघमारे.

Back to top button