
गेवराईच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा भरवली शाळा
गेवराई, ता. ३ (प्रतिनिधी) पुन्हा ती शाळा, पुन्हा ती घंटा, पुन्हा तो वर्ग, तब्बल ३८ वर्षानंतर १९८८_८९ बॅच ची मुले शाळेत येऊन मुख्याध्यापक प्रवीण पंडित सर यांच्या अध्यक्षतेखाली गेवराईच्या विद्यार्थ्यांनी स्नेहमिलन मेळाव्याच्या रूपाने शाळा भरवली.
गेवराई येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवार, दि. ३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास तत्कालीन शिक्षक नारायणराव मोटे, दि. गो. मुंढे, आबासाहेब कराळे, नागरे सर, चव्हाण सर, श्रीमती शोभाताई देशमुख, खडके सर तसेच राजकुमार पोपळघट, पत्रकार सुभाष मुळे आदींची उपस्थिती लाभली. या गुरुजनांचे स्वागत मिलिंद मुळे, मुकेश बजाज, मनिष वाधवाणी, दीपक निकाळजे, प्रविण कुलकर्णी, प्रशांत जाकीटे, समीर जाधव, गोविंद हिटनाळीकर, महेंद्र बाप्ते, डॉ. राजेश सिकची, प्रा. कैलास ठोंबरे, साईनाथ बेदरे, कैलास जवंजाळ, अशोक जायभाये, आनंद मंघारामणी आदींनी केले. दरम्यान सिनेअभिनेते डॉ. सुधीर निकम, प्रकाश भुते, रामेश्वर चातुर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषी अधिकारी भरत कोरडे यांनी केले.
या मेळाव्यास माजी नगराध्यक्ष प्रशांत भागवत, राजेंद्र गिरे, शंकर हाटोटे, श्रीकांत तौर, संतोष लखोटीया, राम जीजा चाळक, दीपक गोंडे, कल्पेश कालावडीया दिलीप मंत्री आदींसह सर्व माजी विद्यार्थी एकत्रित येऊन शाळेस शैक्षणिक भेट दिली. त्यानुसार केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देऊन मेळावा यशस्वी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकूंद टाक यांनी केले. या मेळाव्यास माजी नगराध्यक्ष प्रशांत भागवत, राजेंद्र गिरे, शंकर हाटोटे, श्रीकांत तौर, संतोष लखोटीया, राम जीजा चाळक, दीपक गोंडे, कल्पेश कालावडीया दिलीप मंत्री आदींसह सर्व माजी विद्यार्थी एकत्रित येऊन आपले मनोगत व्यक्त करत शाळेस शैक्षणिक भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत कोरडे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार लोककला अभ्यासक शाहीर विलास सोनवणे यांनी मानले.


