पर्यावरण टिकले तर मानवता टिकेल : प्रा. मधुकर राळेभात

पर्यावरण टिकले तर मानवता टिकेल : प्रा. मधुकर राळेभात
भाजपा शहर मंडलच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
जामखेड प्रतिनिधी : पर्यावरण टिकले तर मानवता टिकेल. कोविड काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना प्रकर्षाने जाणवले असून, झाडांचे संरक्षण व वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जामखेड नगर परिषदेच्या नवीन कार्यालय परिसरात भाजपा शहर मंडलच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संयोजक भाजपा सरचिटणीस मोहन गडदे आणि सहसंयोजक शहर अध्यक्ष ऋषिकेश मोरे होते.
पुढे बोलताना प्रा.राळेभात म्हणाले की, पशुसंवर्धन, पक्षीसंवर्धन आणि मानवासोबत इतर प्राण्यांचे संरक्षण झाले तरच पर्यावरणाचा समतोल टिकतो. त्यामुळे सर्वांनी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी प्रा.अनंता खेत्रे यांनीही मार्गदर्शन करताना देशी झाडे लावण्यावर भर देत विदेशी झाडांऐवजी स्थानिक वृक्षांची लागवड करावी, असे मत व्यक्त केले. ऑक्सिजन निर्मितीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या झाडांचे संवर्धन आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात नगर परिषदेचे बांधकाम समिती सभापती तथा नगरसेवक मोहन पवार, माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण, संचालक बबन हुलगुंडे, डॉ. अशोक बांगर, आरोग्य विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर मिसाळ, तुषार केवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



