बीड

जगन्नाथ मंदीर वर्धापन दिनानिमित्त रामकथा,रथयात्रा व रामनवमीचे  आयोजन..

जगन्नाथ मंदीर वर्धापन दिनानिमित्त रामकथा,रथयात्रा व रामनवमीचे  आयोजन..
बीड दि.१६(प्रतिनिधी) – येथील स्वराज्यनगर भागातील मराठवाड्यात एकमेव असलेल्या जगन्नाथ मंदिराच्या वर्धानदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.यामध्ये दि.१९ मार्च गुरुवार पासून दुपारी ३ते६ या वेळेत रामकथा प्रारंभ होणार असून दि.२५ मार्च बुधवार रोजी कथेची सांगता होणार आहे.याच दिवशी कथा समाप्ती नंतर सायंकाळी ४ वाजता भव्य जगन्नाथ रथयत्रा काढण्यात येणार आहे. या रथयात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून दि.२६ मार्च गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष गोलोक  व्रंदावन दास महाराज व मंदीर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Back to top button