बीड
अमेरिका करारामुळे कापूस – सोयाबीन भाव कोसळले:- राजेंद्र आमटे

अमेरिका करारामुळे कापूस – सोयाबीन भाव कोसळले:- राजेंद्र आमटे
शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने कराराची होळी
बीड (प्रतिनिधी) भारत- अमेरिका करार हा शेतकऱ्यांच्या मुळावर आहे भारतात कापूस सोयाबीन भाव सुधारत असताना अमेरिके सोबत केलेल्या करारामुळे कापूस व सोयाबीन पिकाचे भाव कोसळण्यास भारत अमेरिका करार जबाबदार आहे
भारत अमेरिका यांच्या कृषी करार करण्यात आला या करतात अमेरिकेतील कापूस, सोयाबीन, दूध, मका, गहू, फळ भारत विक्रीसाठी येणार आहेत अमेरिकेतून भारतात येणाऱ्या मालावर 0% कर व भारतातील शेतकरी अमेरिकेत माल घेऊन गेल्यावर भारतीय शेतकऱ्यांना 18% कर का? हा अन्याय नाही का?
भारत अमेरिका करार हा द्विपक्षीय करार नसून हा अमेरिकेने भारतावर लाभलेला करार आहे हा भारतातील शेतकऱ्याला उध्वस्त करणारा करा भारत सरकारने रद्द करण्यात यावा भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे भारताने अमेरिकेत समोर झुकण्याची कसल्याही प्रकारची गरज नसताना हा करार शेतकऱ्यावर लादला जात आहे यामुळे शेतकरी देशोधलेला लागेल यामुळे शेतकरी हक्क मोर्चा या कराराच्या विरोधात आहे
भारत अमेरिका करार तत्काळ रद्द करण्यात यावा हा करार शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे या मुळे भारतातील कापूस सोयाबीन दूध मका गहू फळ या पिकांचे भाव कोसळणार आहेत हा मुळे शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने अमेरिका कराराची होळी करण्यात आली हा करार तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने करण्यात आली या वेळी शेतकरी यांनी भारत अमेरिका करार रद्द झालाच पाहिजे घोषणबाजी करण्यात आली या वेळी शेतकरी हक्क मोर्चाचे शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, राहुल साळुंके, ईश्वर साळुंके, बिभीषण जवंजाळ, इम्रान पठाण, दत्ता जगताप, प्रदीप साळुंके,दादाराव जाधव, किशोर थोरात, संतोष आमटे, लखन आमटे, सचिन आमटे, संतोष आमटे, बलभीम सपकाळ, समाधान घोडके, मधुकर सपकाळ,दत्ता सुरवसे , ईश्वर आमटे, आदी शेतकरी उपस्थित होते
चौकट:- शेतकरी हक्क मोर्चा हा जिल्हाभर शेतकरी जागृती अभियान राबवणार आहे का करार शेतकऱ्यांच्या मुळावर आहे यासंदर्भात शेतकरी जागृती करणार आहे



