बीड

बीडच्या रेल्वे मार्गाचा इतिहास-स्व.केशरकाकूंच्या प्रयत्नाला सलाम

बीडच्या रेल्वे मार्गाचा इतिहास-स्व.केशरकाकूंच्या प्रयत्नाला सलाम

अहमदनगर-बीड-परळी नवीन रेल्वे मार्ग हा सर्वोच्च प्राधान्याने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. सर्वात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांपैकी एक असलेला हा प्रकल्प आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग 261.25 किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी अहमदनगर ते बीड हे काम जवळपास पूर्ण झाले असून विद्युत जोडणी बाकी आहे,लवकरच नगर ते बीडपर्यंत रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होणार असून मराठवाड्यातील प्रवाशांचा प्रवास सोपा आणि सुखकर होणार आहे.या रेल्वे मार्गासाठी कोणत्या काळात कुणी कोणते काम केले हेही नवीन पिढीला माहीत होणे गरजेचे आहे,मुळातच तत्कालीन खा केशरकाकू क्षीरसागर यांनी केलेला प्रयत्नांना सलाम करावा असा इतिहास आहे,स्व काकूंचा पाठपुरावा आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलेली अर्धा खर्च राज्य सरकारने उचलण्याची महत्वाची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे केली व त्यांनी मंजूर केली आणि आजतागायत सुरू राहिली म्हणूनच हा रेल्वे मार्ग आज पूर्ण होताना आपण बघत आहोत यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे ते नाकारता येत नसले तरी खरी माहिती देखील दृष्टीआड करता  लपवता येणार नाही,स्व गोपीनाथराव मुंडे,बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर,जेष्ठ संपादक स्व नामदेवराव क्षीरसागर,स्वातंत्र्य सैनिक स्व बन्सीधरराव जाधव,स्व हिरालाल सारडा,स्व मदनलाल सारडा,जेष्ठ उद्योजक सत्यनारायण लाहोटी,गो गो मिसाळ,अतहर बाबर, जेष्ठ नेत्या उषा दराडे, सुशीला मोराळे,स्व अमोल गलधर,गिरीश देशपांडे,डॉ अरुण भस्मे,पत्रकार गुलाब भावसार,नटवर लाल बुद्धदेव,नामदेव चव्हाण आणि अशा अनेकांचा सहभाग या मागणीसाठी होता आणि आहे
अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा विकास प्रकल्प आहे.त्यावेळी खा केशरकाकू यांनी तत्कालीन तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना भेटून 1995 मध्ये तांत्रिक मान्यता देऊन हा रेल्वेमार्ग मंजूर करण्यात आला. या 261 किलोमीटरच्या मार्गाला सुरूवातीला केवळ 353 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.पुढे यासाठी 4450 कोटींचा निधी प्रस्तावित झाला,यासाठी केंद्राकडून इतका निधी एकाच वेळी मिळणे शक्य नव्हते  या साठी लागणाऱ्या निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे करावा अशी आग्रही मागणी तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही हिरवा कंदील दिला आणि खऱ्या अर्थाने या मार्गाला गती मिळाली नेमकी हीच बाब आज मैलाचा दगड झाली,हा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी स्व काकूंनी नेमके काय काय प्रयत्न केले हेही कळायला हवेत ते या ठिकाणी देत आहोत
बीड जिल्ह्यातील विकासाच्या संदर्भात स्व काकूंनी स्वतः प्रयत्न करत असताना रेल्वे मार्ग आणि दूरदर्शन या दोन प्रमुख मागण्यासाठी बीड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व लोकप्रतिनिधीचे शिष्टमंडळ घेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी,राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग,शंकर दयाळ शर्मा यांची भेट घेऊन या दोन आग्रही मागण्या मांडून चर्चा केली होती सर्वात प्रथम रेल्वे संदर्भात 1980 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग, डॉ शंकर दयाल शर्मा आणि तत्कालीन रेल्वेमंत्री गणी खान चौधरी ,जाफर शरीफ माधवराव शिंदे यांना भेटून स्व.काकूंनी बीड जिल्ह्याच्या या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते,सुरुवातीला सौताडा मार्गे नगर असा सर्व्ह झाला त्यावेळी रेल्वे खात्याने आर्थिकदृष्ट्या हा रेल्वे परवडणारा नसल्याचे कळवले होते तेव्हा स्व काकूंनी बीड जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर हा न परवडणारा मार्ग अंमळनेर मार्गे करणे आवश्यक असल्याचे म्हटले तेव्हा या संदर्भात स्व इंदिरा गांधी यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त करून सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु 1984 साली ऑक्टोबर महिन्यात इंदिरा गांधी यांची हत्या झाली, राजीव गांधी पंतप्रधान झाले त्यानंतर 1985 ला देशात निवडणुका लागल्या आणि स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले तेव्हा स्वर्गीय काकूंनी राजीव गांधी यांच्याकडे सातत्याने रेल्वे संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर नगर बीड परळी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू झाले 1989-90 साली देशात सार्वत्रिक निवडणूक झाली या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता,तेव्हा या मागणीला खंड पडला,स्वर्गीय काकूंचा पराभव झालेला असतानाही त्यांनी या मागणीचा पाठपुरावा सोडला नाही,1991 साली पुन्हा देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या काँग्रेस पक्ष स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत होता प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा केशर काकू बीडमधून निवडून आल्या होत्या त्यावेळी देशाचे पंतप्रधान म्हणून स्व नरसिंहराव हे पंतप्रधान झाले त्या काळात रेल्वेमंत्री म्हणून सुरेश कलमाडी हे होते या काळात केशर काकू क्षीरसागर यांनी प्रयत्नांची शिकस्त करून नरसिंहराव यांच्याकडे आग्रही भूमिका मांडली आणि मंजुरीही करून घेतली तेव्हाच तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी रेल्वे बजेट मध्ये बीडसाठी निधीची घोषणा करून ती मंजूर केली आणि पुढच्या कामाला सुरुवात देखील झाली

पंधरा वर्षापासून मी खासदार आहे 1980 च्या पहिल्या निवडणुकीपासून मी बीड जिल्ह्यातील जनतेला रेल्वेचे आश्वासन दिले आहे मला स्वर्गीय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी आश्वासन दिले होते परंतु ते दुर्दैवाने आता नाहीत तेव्हा माझा हा प्रश्न निकाली काढावा अशी कळकळीची विनंती स्वर्गीय केशर काकू यांनी नरसिंहराव यांच्याकडे केली केली होती त्याचवेळी नरसिंहराव यांनी या रेल्वे मार्गाला हिरवा कंदील दाखवत मंजुरी देऊन टाकली प्रणव मुखर्जी  त्यानंतर चंपावती क्रीडा मंडळाच्या मैदानावर या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले 1999 ते 2004 यादरम्यान पुन्हा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे विधानसभा निवडणुकीत चौसाळा मतदार संघातून विजयी झाले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय विलासराव देशमुख हे होते नगर बीड परळी रेल्वे मार्गाला केंद्राकडून पाहिजे तसा निधी मिळत नसल्यामुळे माजी मंत्री क्षीरसागर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी आग्रही मागणी करून राज्य सरकारचा 50 टक्के वाटा दिल्यास हा रेल्वे मार्ग होऊ शकतो असा प्रस्ताव मांडला विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने ती मागणी मंजूर झाली आणि ती आजतागायत पुढेही चालू आहे,यामुळेच राज्य सरकारचा पन्नास टक्के वाटा या मार्गाला मिळत राहिला आणि या मार्गाचे काम पुढे होत गेले,या रेल्वे मार्गाच्या निधीसाठी वारंवार पाठपुरावा करत प्रत्येक सरकारच्या काळात रेल्वे मंत्र्यांना भेटून वाढीव निधीसाठी प्रयत्न करत राहिल्या,तत्कालीन मंत्री सुरेश कलमाडी, लालू प्रसाद यादव,जाफर शरीफ,सुरेश प्रभू ही नेते मंडळी स्व काकूंची भेट होताच बीडच्या रेल्वेबाबत चर्चा करत असत म्हणजे जोपर्यंत काकू खासदार होत्या तोपर्यंत बीड रेल्वे साठीची त्यांची तळमळ लक्षात घेत होते
एकंदरीतच स्व काकूंनी अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गासाठीचा संघर्ष तब्बल 20 वर्ष केला होता,या काळात हा मार्ग मंजूर होणे,सर्वेक्षण होणे,भूसंपादन होणे,रेलबजेटमध्ये निधी मिळवणे,माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची आग्रही मागणी मंजूर होणे राज्य सरकारचा 50 टक्के वाटा मिळणे आणि पुढे हे काम जलदगतीने सुरू होणे आणि आता नगर बीड हा रेल्वे प्रवास सुरु होणे असा आहे

या रेल्वे मार्गासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद

प्रशांत सुलाखे, बीड

Back to top button