📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त गृहशास्त्र विभागातर्फे पोषण व आरोग्य  आणि सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न

 डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त गृहशास्त्र विभागातर्फे पोषण व आरोग्य  आणि सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न
बीड (प्रतिनिधी) ः येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे माजी नगरध्यक्ष तथा नवगण शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त गृहशास्त्र विभागाच्या वतीने पोषण व आरोग्य या विषयावर सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली. समाजामध्ये आत्ताच्या काळात तरुण पिढीमध्ये सुध्दा उच्च रक्तदाब, मधुमेह, र्‍हदयरोग यांचे प्रमाण वाढत आहे. खाण्याच्या अयोग्य सवयी, पोषण विषयक अज्ञान व जीवन शैलीतील बदल यामुळे तारुण्यावस्थेत विविध विकार जडत आहेत या उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये व समुदायामध्ये पोषण विषयक जनजागृती येण्यासाठी व विद्यार्थ्यांचे पोषण विषयक ज्ञान वाढविण्यासाठी हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फुर्त  सहभाग नोंदवला.
या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेकरीता गृहशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वंदना फटाले, प्रा. शाम कुरे, डॉ. दादासाहेब खोगरे यांनी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
Back to top button