गोरगरिबांची सेवा करणारे नेते प्रा.मधुकर (आबा) राळेभात – नगराध्यक्षा रोहिणीताई घुले

गोरगरिबांची सेवा करणारे नेते प्रा.मधुकर (आबा) राळेभात – नगराध्यक्षा रोहिणीताई घुले
प्रा.मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त ६० रक्तदात्यांचे योगदान; रक्तदान शिबिर संपन्न
जामखेड – भाजपा नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहरातील महावीर भवन येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी दहा वाजता कर्जत नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणीताई घुले यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.
या रक्तदान शिबिरात एकूण ६० रक्तदात्यांनी सहभाग घेतला व रक्तदान केले. या कार्यक्रमात उपनगराध्यक्ष संतोष म्हेत्रे, युवा नेते सचिन घुले, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे, उपाध्यक्ष महावीर बाफना, प्रा. लक्ष्मणराव ढेपे, उद्योगपती आनंद गुगळे, दादासाहेब रिटे, संदीप बोगावत, युवक काँग्रेसचे राहुल उगले, उद्योजक गोरख घनवट, डॉ. सुशील पन्हाळकर, सरपंच अंजलताई ढेपे, जयाताई जाधव, नगरसेवक मोहन पवार, दिगांबर चव्हाण, अमित जाधव, पवन राळेभात, प्रा. जाकीर शेख, अवधूत पवार, गौतम बाफना, विनायक राऊत, पिंटूशेठ, बोरा, मधुकर महानूर सर, ॲड अमृत राळेभात, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल, उमेश माळवदकर, आण्णासाहेब ढवळे, श्रीराम डोके, प्रविण बोलभट, सलिम तांबोळी, दीपक खेडकर, गणेश डोके, अर्जुन लोंढे, रविंद्र छाजेड, मंगेश बेदमुथ्था आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनाच्या वेळी कर्जत नगराध्यक्षा रोहिणीताई घुले म्हणाल्या की, मी भाग्यवान आहे की प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते, त्यामुळे मोठमोठे आजार उद्भवतात. वेळीच तपासणी केल्यास बरे होण्याची शक्यता वाढते. रक्तदान हे सर्वोच्च दान असल्याचे ठाम मत व्यक्त करत प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांचे नगराध्यक्षा रोहिणीताई घुले यांनी मनापासून कौतुक केले.प्रा.राळेभात हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात अष्टपैलू नेतृत्व असून त्यांनी गोरगरिब जनतेची प्रमाणिक सेवा केली आहे.
जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे म्हणाले, प्रा. मधुकर राळेभात हे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अग्रगण्य नेते आहेत. ते लोकांच्या अडचणींना तत्परतेने प्रतिसाद देणारे लाडके नेता आहेत.
उपनगराध्यक्ष संतोष म्हेत्रे यांनी सांगितले की,जिल्हा परिषद सदस्य असताना प्रा. राळेभात यांनी जनसंपर्काद्वारे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले तसेच आगामी काळात होणाऱ्या जामखेड नगर परिषद निवडणुकीत प्रा.राळेभात यांना नगराध्यक्ष होण्याच्या शुभेच्छाही दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत (महाराज) निकम यांनी केले, तर आभारप्रदर्शन पवन राळेभात यांनी मानले.
प्राध्यापक मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मनसे तालुकाप्रमुख प्रदीप टापरे, युवा उद्योजक पै.हवा सरनोबत, तालुका उपाध्यक्ष सनी सदाफुले, अनिल पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अमोल गिरमे, प्राचार्य विकी घायतडक, संदीप गायकवाड आदींनी शुभेच्छा दिल्या.



