📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

राज्यस्तरीय ‘फ्युजन २०२६’ फॅशन शोमध्ये काव्या महिला महाविद्यालयाचा दिमाखदार विजय

राज्यस्तरीय ‘फ्युजन २०२६’ फॅशन शोमध्ये काव्या महिला महाविद्यालयाचा दिमाखदार विजय

काव्या महाविद्यालय आंबेजोगाईच्या विद्यार्थिनींनी पटकावले प्रथम पारितोषिक
आंबेजोगाई | प्रतिनिधी
दयानंद कला महाविद्यालय, आंबेजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्युजन २०२६’ या राज्यस्तरीय फॅशन डिझाइन स्पर्धेत काव्या महिला महाविद्यालय, आंबेजोगाईच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम पारितोषिक पटकावले. संपूर्ण महाराष्ट्रातील २२ महाविद्यालयांच्या सहभागात झालेल्या या स्पर्धेत काव्या महाविद्यालयाच्या संघाने आपल्या कल्पकता, सादरीकरण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
२५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या रंगतदार फॅशन शोमध्ये काव्या महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी शीतल जोशी हिने ‘बॉलिवूड थीम’वर आधारित सादरीकरण करत परीक्षकांची मने जिंकली. पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ साधत केलेल्या या सादरीकरणाला प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त दाद मिळाली.
या यशामागे संस्थेचे अध्यक्ष जयंत करपे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य करुणा लोमटे मॅडम, प्रा. शीला होके, प्रा. अदमाने मॅडम व सर्व शिक्षक व कर्मचारीवर्ग यांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच विद्यार्थिनींना हे यश संपादन करता आले, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
काव्या महिला महाविद्यालयाच्या या दिमाखदार यशामुळे आंबेजोगाई शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन होत आहे.
Back to top button