राजकीय

‘राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलरसोबत काय कनेक्शन?’

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मनोज कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तसंच, मनोज कंबोज आणि समीर वानखेडे यांच्यात चांगले संबंध असल्याचंही नवाब मलिकांनी म्हटलं होतं. नवाब मलिकांच्या आरोपांवर मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रत्तुत्तर दिलं आहे. तसंच, समीर वानखेडे यांना आपण ओळखत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

‘क्रुझ पार्टीत सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनीही आग्रह करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट नवाब मलिकांनी केला होता. हाच धागा पकडत मनोज कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनी मी जे काल बोललो ते सगळं मान्य केलं यासाठी त्यांचे आभार मानतो. त्यांनी क्रूझ पार्टीपासून दाढीवाल्या माणसाचा उल्लेख केला होता.

आज त्यांनी स्वतःच त्या दाढीवाल्याचं नाव अस्लम शेख यांच्यासोबत जोडून खुलासा केला. त्यांनी हे सांगितलं की दाढीवाला अस्लम शेख यांना पार्टीत बोलवत होता. त्यांचा रोख काशिफ खानकडे होता. अस्लम शेख आणि काशिफ खान यांचे काय संबंध आहेत की तो अस्लम शेख यांना पार्टीत येण्यासाठी विनंती करत होता?,’ असा सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे.
मी आधीच सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांचा समावेश या पार्टीत होता. काशिफ खान यांच्याशी त्यांचे संबंध होते. ड्रग्ज माफियांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मुलांचे संबंध आहेत हे आज नवाब मलिकांनी पण मान्य केलं आहे,’ असा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.

Back to top button