राजकीय

मी बंधू शिवेंद्रराजे सोबतच मात्र, खासदार उदयनराजे बॉलसाठी यांचे सूचक विधान !

 

सातारा | खासदार उदेनरजे भोसले यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण अन् राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांची कराड येथे भेट घेतली. जिल्हा बँकेच्या निवडणुकिमुळे राजकिय वातावरण आता तापले आहे. तसेच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

तसेच जिल्ह्यातील राजकिय घडामोडींनाही वेग आला आहे. उंडाळकर यांच्याशी बंददरवाजा बैठकीनंतर पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना बोलता करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांच्या स्टॉईलने उत्तरे दिली. यावेळी बोलताना मी माझ्या बंधूना गेली अनेक दिवस झाले सांगतोय मी तुमच्यासोबत आहे अस विधान भोसले यांनी केले.

तसेच, मला कधी जिल्ह्यातल्या राजकारणात ढवळाढवळ करताना पाहिले का ? पण माझा विषय आला की सगळे ढवळा ढवळ करतात. आता मी ढवळा ढवळ करु का ? असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी फटकेबाजी केली. तसेच मी माझ्या बंधूना गेली अनेक दिवस झाले सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही असं म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना टोला लगावला.

Back to top button