संपादकीय

मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका, एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवारांचे आव्हान

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या दोन आठवड्यापासून एसटी कर्मचारी आंदोलन करत असून अद्याप या आंदोलनावर तोडगा निघालेला नाहीये. त्यातच कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी मसने अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी आज एसटी कामगार आणि संघटनांना आवाहन केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, सध्या राज्य सरकारची आर्थिक स्थिती गंभीर आहे. एस टीचा संप सुरू आहे, त्यामुळे मागण्या योग्य असतील असतील तरच त्याची मागणी करा. मागण्या मान्य करणाऱ्यांनी मागण्यांमागची भावना समजून घ्यावी. मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका, असं आवाहन शरद पवारांनी नाशिकमध्ये केलं आहे.

पवार म्हणाले की, मागच्या सरकारने शिक्षण खात्यातील भरती होवू दिली नाही, त्यांनी भरती थांबवली 4 हजार पदे रिक्त आहेत. रयत शिक्षण संस्थाच समस्यांना तोंड देतेय तर इतर संस्थांना काय अडचणी असतील याचा अंदाज येतो. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन आत्मनिर्भर पिढी उभे करण्याचे काम करा, असं ते म्हणाले. आता या मागणीवर एसटी कर्मचारी काय निर्णय घेतायत हे पाहावे लागणार आहे.

Back to top button